कर्ज मंजूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST2021-02-10T04:30:32+5:302021-02-10T04:30:32+5:30

हस्तपोखरी - कर्जत रस्ता दुरूस्तीची मागणी अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी ते कर्जत या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. खराब ...

A hunger strike warning for loan approval | कर्ज मंजूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा

कर्ज मंजूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा

हस्तपोखरी - कर्जत रस्ता दुरूस्तीची मागणी

अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी ते कर्जत या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी व ग्रामस्थांमधून केली जात आहे.

कुंभारझरी शिवारातील झोपड्यांना भीषण आग

जाफराबाद : तालुक्यातील कुंभारझरी येथील बारामती ॲग्रो कन्नड युनिट- २ शिवारातील ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना सोमवारी अचानक आग लागली. या आगीत कामगारांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत दीपक मोरे, अमोल मोरे, किशोर बनसोडे, बाबासाहेब डोळसे, कैलास बनसोडे, विलास वाघमारे, संजय खरात आदींचे नुकसान झाले. या घटनेचा प्रशासनामार्फत पंचनामा करण्यात आला.

शिवजयंतीची कार्यकारिणी गठीत

अंबड : तालुक्यातील शेवगा येथील जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. या जयंती उत्सव संयोजन समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी भाऊसाहेब बारहाते, सचिवपदी इसाक पठाण, सल्लागारपदी ॲड. श्याम तिकांडे यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीराम तिकांडे, प्रद्युम्न शेरे, गजानन बारहाते, पंकज तिकांडे, संभाजी बारहाते आदींची उपस्थिती होती.

Web Title: A hunger strike warning for loan approval