शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधन दोन वर्षांपासून थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

जिल्ह्यातील अनेक वृध्द कलावंत पारंपरिक कला जोपासून आजही समाजात जनजागृतीचे काम करीत आहेत. अशा वृध्द कलावंतांना शासनाच्या वतीने माधन ...

जिल्ह्यातील अनेक वृध्द कलावंत पारंपरिक कला जोपासून आजही समाजात जनजागृतीचे काम करीत आहेत. अशा वृध्द कलावंतांना शासनाच्या वतीने माधन दिले जाते. हे मानधन मिळावे यासाठी जिल्ह्यातील ६९० जणांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे २०१९- २० मध्ये अर्ज दाखल केले आहेत. तर सन २०२०- २१ मध्ये ३६८ अर्ज दाखल झाले आहेत. शासनस्तरावरून निधी प्राप्त न झाल्याने संबंधितांना निधीचे वाटप करण्यात आलेले नाही. अनुदान मिळावे, यासाठी कलावंतांचे मात्र, कार्यालयात खेटे सुरू आहेत.

समिती गठीत नाही

वृध्द कलावंतांसाठी असणारी जिल्हास्तरीय समिती बरखास्त होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु, या समितीचेही गठण करण्यात आलेले नाही. त्यामुळे दाखल होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करणार कोण ? असा प्रश्नही अधिकाऱ्यांसमोर उभा आहे.

मी २०१३ पासून अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करीत आहे. परंतु, त्रुटी दाखवून प्रस्स्ताव नाकारला जात आहे. तर अर्ज दाखल केलेल्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही.

-नारायण बडनेरे,

पारध बु.

समाज प्रबोधनासाठी आजही अनेक कलावंत जनजागृतीचे काम करीत आहेत. परंतु या कलावंतांची मानधनासाठी फरफट होत आहे.

उर्मिला सोळुंके

गोंदी

वृध्द कलावंतांना मानधन मिळत नसल्याने आर्थिक कोंडी होत आहे. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने कलावंतांना मानधन वेळेत मिळणे गरजेचे आहे.

एकनाथ तोडकर

गोंदी

अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा

शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी जिल्ह्यातील वृध्द कलावंतांनी अर्ज दाखल केले आहेत. कलावंतांना देण्यात येणारे मानधन मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. शिवाय समिती गठीत करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

- नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प. जालना

मानधन किती (रूपये

प्रती माह )

राष्ट्रीय पातळीवरील कलाकार, साहित्यिक २१००

राज्य पातळीवरील कलाकार, साहित्यिक १८००

जिल्हा पातळीवरील कलाकार, साहित्यिक १५००