पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गावा-गावात मदत फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:25 AM2019-08-26T00:25:17+5:302019-08-26T00:25:48+5:30

जालना शहरासह जिल्हाभरातील संस्था, संघटना, शाळकरी मुलांसह सर्वसामान्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे.

To help flood victims, visit villages and villages | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गावा-गावात मदत फेरी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गावा-गावात मदत फेरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, तेथील सर्वसामान्यांसमोर अनेक प्रश्न उभा आहेत. ही बाब पाहता जालना शहरासह जिल्हाभरातील संस्था, संघटना, शाळकरी मुलांसह सर्वसामान्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे.
विद्यार्थ्यांनी जमा केलेली मदत
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत पाठविली. या शाळेतील विद्यार्थ्यांनी बुटखेडा, सातेफळ, पोखरी या गावात मदत फेरी काढून रोख रक्कमेसह अत्यावश्यक वस्तू जमा केल्या. यासाठी मुख्याध्यापक सुरेश बुरकूल, शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
जि.प. शाळा, सेवली
सेवली : येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्यावतीने मदत फेरी काढण्यात आली. या मदत फेरीच्या माध्यमातून रोख रक्कम व धान्य गोळा करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्ही. बी. चव्हाण, मुख्याध्यापक के. बी. डोईफोडे, एम. आर. काळे, व्ही. एल. बिरादार, टी. जी. शेख, एस. जी. सोसे, आर. एस. जायभाये, एल. आर. चव्हाण, आर. डी. पालवे, जी. पी. मगर, आर. व्ही. देशपांडे, व्ही. बी. चव्हाण, आय. एच. शेख, एस. आय. सय्यद, ए. डी. खरूले, टी. एन. वाघमारे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती होत होते.
ग्रा.पं.कार्यालय, साष्टपिंपळगाव
शहागड : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. या मदत फेरीत सरपंच अलका झिने, एस. एम. कुलकर्णी, संतोष झिने, संभाजी बोचरे, गोपाल तांबडे, अनिल ठाकूर, सर्जेराव सकट, गोरख आहेर, गोविंद तांबडे, महादेव बोचरे, लहू झिने, ताराचंद बोचरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
गोद्री येथे मुस्लिम बांधवांकडून मदत
गोद्री : येथील जामा मस्जिद कमिटी व मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. याप्रसंगी जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष हाफीज शे. आरेफ, सामाजिक कार्यकर्ते शे.नसीम शे.अमीर, शे. ऐजाज शे. अयाज, शे. मोईन शे. हैदर, खमीस चाऊस, शे. असलम शे. ईस्माईल, जावेदखाँ पठाण आदींची उपस्थिती होती.
साडेपाच हजारांचा निधी जमा
हसनाबाद : येथील गजानन विद्यालयातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात ५ हजारांचा निधी जमा झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक एन. एस. कोल्हे, व्ही. जी. चव्हाण, एस. पी. सरकटे, एस. आर. जोशी, वरखडे, के. के. सरोदे, एस. एस. गुजर, जे. एम. आत्राम, व्ही. एस. इंगळे, एस. एल. भुरके आदीं.
जि.प. के. प्रा. शाळा, आंबा
आंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली. या मदत फेरीतून ३ हजार ५०७ रुपये जमा करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दीपाली बोनगे, कैलास बोनगे, केंद्रप्रमुख जोशी, मुख्याध्यापक बी. भुतेकर यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
पूरग्रस्तांसाठी २१ हजारांची मदत
जालना येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने पूग्रस्तांसाठी २१ हजारांची मदत करण्यात आली. यावेळी डॉ. राजकुमार म्हस्के, सुधीर गायकवाड, डॉ. नरसिंग पवार, विक्रम राठोड, डॉ. बालाजी मुंडे, दीपक बुक्तरे, मीना बोर्डे, डॉ. रेणुका बडवणे, विकास पाटील, रमेश गजर, प्रकाश दांडगे, सुमन लाखे, शाम कांबळे, संजय गाढे आदींची उपस्थिती होती.

Web Title: To help flood victims, visit villages and villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.