रस्त्यावर मातीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST2021-02-16T04:31:40+5:302021-02-16T04:31:40+5:30

पघळ यांचा सत्कार घनसावंगी : सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले दैठणा खुर्द येथील भाऊसाहेब पघळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात ...

Filling the road with soil | रस्त्यावर मातीचा भराव

रस्त्यावर मातीचा भराव

पघळ यांचा सत्कार

घनसावंगी : सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले दैठणा खुर्द येथील भाऊसाहेब पघळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पोउपनि गजानन कौसाळे, सरपंच गजानन पघळ, उपसरपंच बंडू बुलबुले, राजू पघळ आदींची उपस्थिती होती.

उपाध्यक्षपदी शेळके

अंबड : तालुक्यातील आलमगाव येथील विष्णू शेळके यांची मराठा सेवा संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शेळके यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

मतदार यादी प्रसिध्द

मंठा : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मंठा नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहेे. मतदार यादीवर काही आक्षेप असतील तर ते तत्काळ नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी येथील मत्स्योदरी विद्यालयातील पहिली ते दहावीच्या मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली. दृष्टीदोष असणाऱ्यांना मोफत चष्मे वाटप केले जाणार आहेत.

Web Title: Filling the road with soil