शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाकाठी ३०० वर बालकांना ज्वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:01 IST

बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन २५० ते ३५० बालकांवर उपचार केले जात असून, अंतररूग्ण विभागातही २५ ते ३० बालके उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेषत: तापाचे रूग्ण वाढले असून, खाजगी रूग्णालयेही फुल्ल होत आहेत. तापामुळे बालकांच्या प्लेटलेटवरही परिणाम होताना दिसत आहे.वातावरणातील बदलांमुळे गत काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्यासह इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: ताप अधिक असल्याने डेंग्यूसदृश आजाराप्रमाणे प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. लहान बालकांना अचानक ताप येत असल्याने जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील बालरूग्ण उपचारासाठी येत आहेत. जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या २५० ते ३०० वर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अंतररूग्ण विभागात उपचारासाठी दैनंदिन साधारणत: २० ते २५ बालके दाखल होत आहेत. शहरातील खाजगी रूग्णालयात अ‍ॅडमिट होणाºया बाल रूग्णांची संख्याही मोठी आहे.बदलते वातावरण, डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ पाणी यासह इतर कारणांमुळे बाल रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एखाद्या बालकाच्या शरीरात अधिक काळ ताप राहिली तर डेंग्यूसह इतर आजाराची शक्यता असते. त्यामुळे बालके आजारी पडल्यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोरडा दिवस पाळणे, हात स्वच्छ धुणे, शारीरिक स्वच्छता, पौष्टिक अन्न खाणे, आहारात फळांचा, ताज्या भाज्या वाढविणे गरजेचे असल्याचे जिल्हा रूग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात डेंग्यूसारख्या आजाराचे रूग्ण आढळून आलेले नाहीत. मुलांना तापासह इतर आजार असतील तर तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.शहरासह ग्रामीण भागात मच्छराचे प्रमाण वाढलेले आहे. बदलते वातावरण आणि मच्छरांमुळे बालकांसह वयोवृध्दही आजारी पडू लागले आहेत. विशेषत: बालकांना ताप, सर्दी, खोकला आदी आजार जडत आहेत. शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालयात रूग्णांची मोठी गर्दी होत आहे. या आजाराची लागण होऊ नये, यासाठी पालकांनी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेषत: प्रत्येक आठवड्याला कोरडा दिवस पाळणे, घरासह परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, मुलांचे वेळोवेळी हात धुणे, त्यांच्या शारीरिक तपासणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय