शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले युवामंच शाखेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

वीजग्राहकांची गैरसोय बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे शासकीय, निमशासकीय कामावर परिणाम होत ...

वीजग्राहकांची गैरसोय

बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे शासकीय, निमशासकीय कामावर परिणाम होत आहे, शिवाय शेतकऱ्यांचीही गैरसोय होत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

हाताडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आंबा : परतूर तालुक्यातील हाताडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २५० ग्रामस्थांची बीपी, शुगर, रक्त आदी विविध प्रकारची तपासणी करण्यात आली, तसेच गरजूंना औषधोपचाराचे वाटप करण्यात आले. शिबिरासाठी डॉ.श्यामकुमार सुरेश, सरपंच मधुकर झरेकर व इतरांनी परिश्रम घेतले. यावेळी मदन बोरकर, राजाराम गाढवे, दुर्वास फटिंग, मारोती बोरकर, शाम झरेकर, किशन बोरकर, बाळू फटींग, विलास बोरकर, गोविंद बोरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मराठा आरक्षणाबाबत शिवणगाव येथे ठराव

घनसावंगी : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवणगाव येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले, तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेण्यात आला. हा ठराव आता शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दुचाकीचे चालक ओलांडतायत वेग मर्यादा

जालना : शहरातील विविध भागांतून दुचाकी चालविणारे अनेक दुचाकी चालक वेग मर्यादा ओलांडून दुचाकी धूमस्टाईल पळवित आहेत. अनेक दुचाकी चालकांनी सायलन्सर काढून टाकल्याने कर्णकर्कश आवाज येत आहे, शिवाय अनेक दुचाकींचे नंबर प्लेटही गायब झालेले आहेत. त्यामुळे वाहतूक नियम माेडणाऱ्या चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.