मोठ्या भावाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार केला; लहान भावाने तडफडत प्राण सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 12:21 IST2021-11-04T12:16:21+5:302021-11-04T12:21:16+5:30

ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांचे म्हणणे आहे.

The elder brother attacked him with an axe in anger; The younger brother died in agony | मोठ्या भावाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार केला; लहान भावाने तडफडत प्राण सोडला

मोठ्या भावाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार केला; लहान भावाने तडफडत प्राण सोडला

जालना : येथील मियाँसाहेब दर्गा परिसरात मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांचे म्हणणे आहे. शेख शोजेब शेख मन्सूर (३४) असे मयताचे नाव आहे.

शहरातील मस्तगडजवळ मियाँसाहेब दर्गा भागात राहणारे शेख खोसरी शेख मन्सूर आणि शेख शोजेब शेख मन्सूर हे दोघे कुटुंबीयांसह राहतात. मयत शोजेब शेख मन्सूर हा मानसिक रुग्ण होता. त्यांच्यात नेहमीच किरकोळ वाद होत असत. मंगळवारीही रात्री त्यांच्यात वाद झाला. त्यात रागाच्या भरात मोठा भाऊ शेख खाेसरी याने लहान भाऊ शेख शोजेब मन्सूर याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच कदीम ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कदीम ठाण्यात गुन्हा दाखल केला नव्हता. यावेळी जालन्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु यांनी भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली.

Web Title: The elder brother attacked him with an axe in anger; The younger brother died in agony