मराठा सेवा संघास ७ लाखांची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST2020-12-30T04:41:10+5:302020-12-30T04:41:10+5:30

महत्त्वाची बातमी फोटोसहित घेणे भोकरदन : जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी मराठा सेवा संघाच्या भाग्यनगर येथील सभागृहाच्या ...

Donation of Rs. 7 lakhs to Maratha Seva Sangh | मराठा सेवा संघास ७ लाखांची देणगी

मराठा सेवा संघास ७ लाखांची देणगी

महत्त्वाची बातमी फोटोसहित घेणे

भोकरदन : जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी मराठा सेवा संघाच्या भाग्यनगर येथील सभागृहाच्या नूतनीकरणासाठी सात लाख रुपयांची देणगी दिली आहे.

जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा भोकरदनचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी वडील माजी खासदार स्व. अ‍ॅड. भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही देगणी दिली. मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आर.आर. खडके, अण्णा व जिल्हा सचिव काकासाहेब खरात यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला. मराठा सेवा संघ, जालनाच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम प्रगतिपथावर असून, या देणगीमुळे सदरील बांधकामास अधिक चालना मिळणार आहे. यावेळी नगरसेवक संतोष अन्नदाते, माजी पं.स. सदस्य अण्णासाहेब खंदारे, सोपान सपकाळ, मधुकर सोनवणे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Donation of Rs. 7 lakhs to Maratha Seva Sangh