भरघोस मदत जाहीर करावी- धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:43 IST2018-11-18T00:43:00+5:302018-11-18T00:43:14+5:30
शासनाने शेतक-यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

भरघोस मदत जाहीर करावी- धनंजय मुंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सुखापुरी : सरकार दुष्काळ जाहीर करत आहे. पण, मदत मात्र जाहीर करत नाही. सध्याचा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण दुष्काळ आहे. यामुळे सरकारने कसलाही विचार न करता शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी. मुख्यमंत्री केवळ बैठका घेत आहेत. पण, बैठका घेऊन भागत नाही. दुष्काळ जाहीर करून २५ दिवस झाले आहेत. यामुळे शासनाने शेतक-यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
अंबड तालुक्यातील सुखापुरी व बेलगाव येथे शनिवारी दुपारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुखापुरी महसूल मंडळात पडलेल्या भीषण दुष्काळाची पाहाणी करून शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
शेतक-यांचे चालू वर्षाचे कृषी वीजबिल माफ करून शेतक-यांच्या मुलांची सर्व शिक्षणाची फीस शासनाने भरावी. २० ते २५ वर्षात फळबागांची शेतकरी जपवणूक करतात. मात्र, अशा भीषण दुष्काळात सर्वच फळबागा नष्ट होतात. यामुळे शेतक-यांच्या दोन पिढ्या उद्धवस्त होतात. अशा वेळी त्यांना खºया अर्थाने आर्थिक मदतीची गरज असते. यामुळे येत्या दोन दिवसात होणा-या हिवाळी अधिवेशनात बागायती जमिनीस हेक्टरी १ लाखांची मदत मिळावी व जिरायत जमिनीस हेक्टरी ५० हजारांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
यावेळी आ. राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, सतीश होंडे, रईस बागवान, डॉ. पवार, राजन उढाण, बाबासाहेब बोंबले, परमेश्वर काळबंडे, जिजा मोताळे आदींसह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.