आगारप्रमुखांना पाच हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:45 AM2019-12-01T00:45:46+5:302019-12-01T00:46:17+5:30

शिवशाही बसमध्ये असलेल्या सुविधांमधील एसी, मोबाईल चार्जिंग बंद ठेवल्याप्रकरणी जालना आगारप्रमुखांना जिल्हा ग्राहक मंचने पाच हजार रूपये दंड ठोठावला

Deposit chief fined five thousand rupees | आगारप्रमुखांना पाच हजार रुपयांचा दंड

आगारप्रमुखांना पाच हजार रुपयांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिवशाही बसमध्ये असलेल्या सुविधांमधील एसी, मोबाईल चार्जिंग बंद ठेवल्याप्रकरणी जालना आगारप्रमुखांना जिल्हा ग्राहक मंचने पाच हजार रूपये दंड ठोठावला. ही घटना १२ जुलै रोजी घडली होती.
जालना येथील बसस्थानकातून सतिश रतनलाल दायमा व गणेश रतनलाल बजाज हे १२ जुलै रोजी औरंगाबादकडे जात होते. ते शिवशाही बसमध्ये एसी, मोबाईल चार्जिंग असल्याने ते त्या बसमधून प्रवास करीत होते. मात्र, बसमधील एसी व मोबाईल चार्जिंग नव्हती. त्यामुळे सतीश दायमा यांनी अ‍ॅड. महेश धन्नावत यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात आगार प्रमुखांनी अर्जदाराने बसबद्दल समस्या असतील तर लगेच वाहकाकडे तक्रार करणे, संबंधित स्थानकातील नोंद पुस्तिकेत नोंद करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यावेळी अ‍ॅड. धन्नावत यांनी वाहकाला तोंडी तक्रार केली होती. व तक्रार पुस्तिका बसमध्ये उपलब्ध नसतात. बस चांगल्या स्थितीत असेल तर निघतेवेळी जेथे बसची तपासणी केली त्याचा अहवाल आगार प्रमुखांनी सादर केला असता किंवा वाहकाचे शपथपत्र दाखल करू शकले असते. शिवशाही बस हवाबंद असल्याने व एसी सुविधा बंद असल्याने प्रवास करणे असायह्य होते, असा युक्तीवाद केला. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व विधीज्ञांचा युक्तीवाद ग्राह्य धरून ग्राहक मंचच्या सदस्य निता कांकरिया यांनी जालना आगार प्रमुखांना पाच हजार रूपये दंड व तिकीटाचे पैसे देण्याचा आदेश दिला. या प्रकरणात अ‍ॅड. महेश धन्नावत यांच्यासह अ‍ॅड. आशिष इंगळे, अ‍ॅड. शुभम भारूका, अ‍ॅड. श्वेता यादव यांनी काम पाहिले.
बस सुस्थितीत ठेवणे गरजेचे
राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात प्रवाशांना अनेक विचित्र अनुभव येतात. असाच अनुभव सतिश दायमा व त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आला. त्यानंतर आता ग्राहक मंचनेच आगार प्रमुखांना पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी प्रवाशांना सर्व सोयी-सुविधा मिळण्यासाठी बसेस सुस्थितीत ठेवणे गरजेचे असल्याचे दिसून येते.

Web Title: Deposit chief fined five thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.