किक्रेट स्पर्धेतून सांघिक भावना वृद्धिंगत होते -मनोहर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:54+5:302021-02-08T04:26:54+5:30

देळेगव्हाण : स्पर्धा ही सर्व तरुणांना एकत्र आणणारा महत्त्वाचा घटक असून, यातून सांघिक एकोपा व बंधुभावाची जोपासना होते. एकात्मता, ...

Cricket competition enhances team spirit - Manohar Jadhav | किक्रेट स्पर्धेतून सांघिक भावना वृद्धिंगत होते -मनोहर जाधव

किक्रेट स्पर्धेतून सांघिक भावना वृद्धिंगत होते -मनोहर जाधव

देळेगव्हाण : स्पर्धा ही सर्व तरुणांना एकत्र आणणारा महत्त्वाचा घटक असून, यातून सांघिक एकोपा व बंधुभावाची जोपासना होते. एकात्मता, आपुलकी प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी स्पर्धांच्या आयोजनाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते मनोहर जाधव यांनी नांदखेड येथे रविवारी दुपारी बक्षीस वितरण कार्यक्रमात केले.

ग्रामीण भागातील युवकांना खेळाची आवड लागवी, तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी नांदखेड येथे खुल्या टेनिस बॉल किक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी पार पडले.

या स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेतला होता. गिरोली संघाने प्रथम, तर नांदखेड संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. विजेत्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना जाधव म्हणाले की, या तरुणांमधील खेळण्याचे कौशल्य व त्यांची उत्सुकता अतिशय वखाणण्याजोगी असून, खेळाचा सराव जर कायम ठेवला, तर यशस्वी होऊन तुमच्या हातून तालुक्याचे व गावाचे नाव मोठे होईल, याची मला खात्री असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बाबासाहेब सवडे, उद्धव जायभाये, समाधान सवडे, सतीश सवडे, राजेंद्र जंजाळ, आकाश वाघ, दीपक माळी, पवन सवडे, गजानन कुर्हे, सुभाष सवडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Cricket competition enhances team spirit - Manohar Jadhav