रस्ता कामाबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:54+5:302021-02-09T04:32:54+5:30

गोरंट्याल यांनी साधला आंदोलकांशी संवाद अंबड : तालुक्यातील साष्ठपिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास आमदार कैलास गोरंट्याल यांनी ...

Complaint about road work | रस्ता कामाबाबत तक्रार

रस्ता कामाबाबत तक्रार

गोरंट्याल यांनी साधला आंदोलकांशी संवाद

अंबड : तालुक्यातील साष्ठपिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास आमदार कैलास गोरंट्याल यांनी भेट दिली. आ. गोरंट्याल यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंदोलक, ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

हसनाबाद येेथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

हसनाबाद : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमात कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी कोरोना काळात काम करताना आलेल्या अडचणी, केलेले काम, नागरिकांचा प्रतिसाद आदींबाबत अनुभव कथन केले. यावेळी देवा आकोदे, गणेश जाधव, दामोदर दाभाडे, संदीप भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. जेवरीकर, आरोग्य कर्मचारी विष्णू तंगे, औषध निर्माता जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Complaint about road work