शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाना शिवारातील शेतात आढळला अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:09 IST

भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारातील शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी भोकरदन ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ठळक मुद्देखळबळ : घातपाताची शक्यता; ओळख पटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारातील शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी भोकरदन ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील रामदास बजेबा गावंडे यांचे घारेवाडी शिवारातील शेत आहे. शेतकरी रामदास गावंडे व त्यांच्या पत्नी गुरूवारी शेतामध्ये काम करत होत्या. शेताच्या कपाशी मधील जमिनीमध्ये कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येत होता. तसेच उग्र वास येत होता. त्यामुळे गावंडे व त्यांच्या पत्नीने कपाशीच्या शेतात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी एका महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील पार्थिव दिसून आले. त्यांनी लगेच गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी भोकरदन पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, पोनि दशरथ चौधरी, बीट जमादार नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. महिलेचे पार्थिव सहा ते सात दिवसांपूर्वी येथे टाकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मागे घातपाताची शक्यताही वर्तविण्यात आली असून, पोलिसांनी मयत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.शवविच्छेदनासाठी पार्थिव औरंगाबादलाघटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मयत महिलेचे पार्थिव कुजून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलेचा चेहराही ओळखू येत नव्हता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चेअंती शवविच्छेदन औरंगाबाद येथे करण्याचा निर्णय घेतला. मयत महिलेचे पार्थिव औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात नेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू