शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

कॅनरा बँक सव्वासात कोटींचा घोटाळा: पैशातून सुवर्ण मूल्यमापकने कर्ज फेडले, २ प्लाॅटही घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:28 IST

सुवर्णकर्ज पॅकेजचे पुनर्मूल्यांकन आणि पडताळणी दर ३ महिन्यांनी केली जाते.

- संतोष सारडाबदनापूर (जि. जालना) : येथील कॅनरा बँकेतील सव्वासात कोटींच्या गोल्डन घोटाळ्यातील संशयित असलेल्या सुवर्ण मूल्यमापकाने १९ लाखांचे खाजगी कर्ज फेडून ४४ लाखांचे २ प्लॉट विकत घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही संशयितांना २ दिवसांची कोठडी सुनावली.

येथील कॅनरा बँकेतील सव्वासात कोटींच्या घोटाळ्याचा तपास पोलिस निरीक्षक एम.टी. सुरवसे यांनी सुरू केला आहे. संशयित शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुऱ्हाडे या दोघांच्या बदनापूर येथील घरांची पोलिसांनी झडती घेतली आहे. यात पाटणकर यांच्या घरात काही मिळालेले नाही. मात्र, सुवर्ण मूल्यमापक बुऱ्हाडे याच्या घरातून ४४ लाखांच्या २ प्लॉटची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. शिवाय, त्याने खाजगी लोकांचे १९ लाखांचे कर्ज या घोटाळ्याच्या पैशांतून फेडल्याची माहिती पोनि सुरवसे यांनी दिली.

कामासाठी बँकेतून गेलेला तिसरा संशयित परत आलाच नाहीकॅनरा बँकेत पहिल्या दिवशी तपासणी अर्धवट राहिल्यामुळे दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी पुनर्मूल्यांकन पथक दुपारी सुमारे १२:०० वाजता पोहोचले. मात्र, संशयित बँक अधिकारी संजय आसाराम डोंगरे हा कामासाठी बाहेर चाललो, अर्ध्या तासात परत येतो, असे सांगून निघून गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. त्याच्याशी संपर्कदेखील होत नाही. त्याच दिवशी या आरोपीने बँकेतील सोन्याची पाकिटे खिशात ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

पहिल्याच दिवशी सोन्याची पाकिटे आढळलीसुवर्णकर्ज पॅकेजचे पुनर्मूल्यांकन आणि पडताळणी दर ३ महिन्यांनी केली जाते. बदनापूरच्या कॅनरा बँकेत पुनर्मूल्यांकन प्रक्रिया २२ एप्रिल रोजी सुरू करण्यात आली. प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे आणि सुवर्ण मूल्यमापक सचिन के. मांड यांनी ९८ सुवर्ण कर्ज पाकिटांचे पुनर्मूल्यांकन केले. त्यापैकी दोन पाकिटांमध्ये बनावट सोने असल्याचे आढळले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्यादिवशी सायंकाळी हे काम थांबविण्यात आले. २३ एप्रिल रोजी पुनर्मूल्यांकन सुरू झाले. त्यानंतर बनावट सोने आढळून आले. २४ एप्रिलला ताळमेळ प्रक्रियेत सोन्याच्या कर्जाची ३० पाकिटे गहाळ झाल्याचे समोर आले.

२० ते २५ जणांची टीम बनविल्याची चर्चागोल्डन घोटाळा बाहेर आल्यानंतर बनावट सोने तारण ठेवून ज्यांच्या नावावर कर्जाची रक्कम वर्ग करण्यात आली, अशा सुमारे २० ते २५ जणांची टीम कार्यरत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जात होती. नंतर या बँक खात्यांमधून अवघ्या दोन- तीन मिनिटांतच ही रक्कम दुसऱ्या बँक खात्यांमध्ये वर्ग केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Canara Bank Scam: Gold Appraiser Repays Debt, Buys Plots with Money

Web Summary : Canara Bank's 7.25 crore scam revealed: Gold appraiser repaid debt, bought plots. Manager absconded. Fake gold found in packages, 30 packets missing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाGoldसोनं