शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जीवरेखा धरण कालव्याच्या गेटचे रॉड तुटल्याने कालवा ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST

७ तासांच्या अथक परिश्रमानंतर गेट बंद करण्यात आले यश टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरण कालव्याच्या मुख्य ...

७ तासांच्या अथक परिश्रमानंतर गेट बंद करण्यात आले यश

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरण कालव्याच्या मुख्य गेटचे रॉड तुटल्याने धरणातून प्रचंड दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, या कामी कर्तव्य बजावणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांच्या मदतीला अकोलादेव येथील शेकडो ग्रामस्थ धावून आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. सध्या धरण पाण्याने तुडुंब भरले असताना असा प्रकार घडल्याने धरण व कालव्याच्या सुरक्षिततेकडे पाटबंधारे विभागाचे लक्ष आहे काय ? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केले जात आहे.

याबाबत माहिती अशी की, यावर्षी जीवरेखा धरण तुडुंब भरल्याने या धरणातून काढलेल्या कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी पुरविले जात आहे. साधारण दीड महिन्यापूर्वी धरणातून पहिल्यांदा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या वेळच्या पाण्यासाठी कालव्याचे गेट उघडण्यासाठी मंगळवारी कर्मचारी गेले असता गेटचे मुख्य रॉड तुटून गेले. यामुळे गेट संपूर्ण उघडल्याने धरणातून प्रचंड दाबाने पाणी कालव्यात वाहू लागले. बघता बघता कालवा ओव्हरफ्लो होऊन अकोलादेव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ कालव्याच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले.

हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच अकोलादेव येथील जवळपास २०० युवक व ग्रामस्थ धरणाकडे धावले. तोपर्यंत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांसह गेट दुरूस्ती मॅकेनिकल तेथे उपस्थित झाले होते. मात्र, पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गेट दुरुस्तीचे काम अशक्य झाले होते. अखेर युवक व ग्रामस्थांनी दगड, माती, पलाट्याचे फास असे हातात पडेल ते साहित्य गेटजवळ टाकून ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे पाणी कसेबसे रोखले गेले. याकामी पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक बी. आर. जगदाळे, बबन छडीदार, कोलते आदींसह अकोलादेव व परिसरातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. दरम्यान, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पुढील अनर्थ टळला असला तरी गेटच्या दुरुस्तीकडे उन्हाळ्यातच लक्ष का दिले गेले नाही? तालुक्यातील सर्वात मोठ्या या धरणाच्या सुरक्षिततेबाबत पाटबंधारे विभाग इतके उदासिन का ? असे अनेक प्रश्न शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

चौकट

कालव्याच्या गेटच्या दुरुस्तीचे काम यावर्षी उन्हाळ्यात केले गेले होते. मात्र, मागील दीड महिन्यापूर्वी कालव्यातून पहिले पाणी सोडल्यानंतर गेट बंद करताना रॉड नादुरुस्त झाला होता. आता त्यावर पाण्याचा प्रचंड दाब आल्याने दुसऱ्या पाण्यासाठी गेट उघडताना रॉड तुटून गेला. सध्या कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने गेट पूर्णत: दाबण्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यानंतर गेटची पूर्ण दुरुस्ती केली जाईल.

माधुरी जुन्नारे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, टेंभुर्णी.