अंबड शहरात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:27 IST2019-09-25T00:26:49+5:302019-09-25T00:27:31+5:30
माळी गल्ली भागातील एक घर फोडून चोरट्यांनी आतील दोन लाख रूपयांची रोकड लंपास केली.

अंबड शहरात घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : येथील माळी गल्ली भागातील एक घर फोडून चोरट्यांनी आतील दोन लाख रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी पहाटे घडली असून, या प्रकरणी सोमवारी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड येथील माळी गल्ली भागात राहणारे बबन सखाराम बारेकर हे ११ सप्टेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधून १२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या छताचे पत्रे उचकटून आतमध्ये प्रवेश केला. आतील कपाटाचे हॅण्डल तोडून लोखंडी पेटीचे लॉक तोडून स्टील डब्यात ठेवलेले रोख २ लाख रूपये लंपास केले.
या प्रकरणी बबन बारेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि शेळके हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.