शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमनच्या खांद्यावर शासकीय पत्रांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 01:07 IST

जालना शहरातील पोस्टमनची संख्या अपुरी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सोशल मीडियाचा वापर वाढला आणि पोस्टातून जाणारी कौटुंबिक पत्रे जणू बंद झाली! कौटुंबिक पत्र पोहोचविण्याचे काम कमी झाले असले तरी पोस्टमनच्या खांद्यावर शासकीय कागदपत्रांचा भार वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत जालना शहरातील पोस्टमनची संख्याही अपुरी आहे. तर दुसरीकडे पोस्टात सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंन्टस बँक, पोस्ट बँक सेवेचा जिल्ह्यातील २५ हजाराहून अधिक ग्राहक लाभ घेत असून, यात ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.काही वर्षांपूर्वी दूर राहणाऱ्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचे माध्यम पत्रव्यवहार हा होता. एकमेकांची सुख, दु:खं, कार्यक्रमांचे निमंत्रण, घटना-घडामोडी आदींचा उल्लेख असणारे पत्र्यवहार अधिक प्रमाणात होत असत. मात्र, सोशल मीडियाचा वापर वाढला आणि दूर गावातीलच नव्हे तर विदेशातील नातेवाईकाही थेट संपर्कात आले. त्यामुळे आपसूकच पोस्ट कार्यालयातून होणारा कौटुंबिक पत्रव्यवहार हा कमी झाला. असे असला तरी शासकीय पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बँका, महसूल, पोलीस, न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर विविध शासकीय कार्यालयातील पत्रांचा भार पोस्ट कार्यालयावर दिवसेंदिवस वाढत आहे.जालना येथील पोस्ट कार्यालयात १७ पोस्टमन कार्यरत आहेत. यात जुना जालना भागात ७ तर नवीन जालना भागात १० पोस्टमन कार्यरत आहेत. मात्र, दैनंदिन येणाºया कागदपत्रांची संख्या पाहता पोस्टमन अपुरे पडत आहेत. शहराचा वाढलेला विस्तार आणि कार्यालयावरील वाढलेला कामाचा ताण पाहता पोस्टमनची संख्या वाढविणे गरजेचे आहे.पोस्ट बँक आणि इंडिया पोस्टल पेमेंट बँकेतून व्यवहार करण्याकडे शहरी, ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. विविध बिलांचा भारणा, बचत खात्यांचा व्यवहार, मोबाईल रिचार्ज, शिषवृत्ती, मनरेगाच्या पैशांची देवाण-घेवाण, कृषी संबंधित कामे, गरजुंना तात्काळ पैसे पाठविणे, पेन्शन, डीबीटीचा लाभ आदी विविध व्यवहार या बँकेद्वारे करता येत आहेत. मोबाईलवरील अ‍ॅॅपवरूनही हे सर्व व्यवहार होत असल्याने ग्राहकांचा कल वाढला आहे. जालना येथील मुख्य पोस्ट कार्यालयासह जिल्ह्यातील १९७ शाखांमधून आजवर जवळपास २५ हजाराहून अधिक ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेणे सुरू केले आहे.

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसCentral Governmentकेंद्र सरकार