शरीर ही माणसाची खरी संपत्ती : प्रा. प्रदीप देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:01+5:302021-02-10T04:31:01+5:30

मंठा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर मंठा : आयुुर्वेदाचा वापर मानवाने अगदी पुरातन काळापासून केला आहे. रामायण, ...

The body is the real property of man: Pvt. Pradeep Deshmukh | शरीर ही माणसाची खरी संपत्ती : प्रा. प्रदीप देशमुख

शरीर ही माणसाची खरी संपत्ती : प्रा. प्रदीप देशमुख

मंठा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मंठा : आयुुर्वेदाचा वापर मानवाने अगदी पुरातन काळापासून केला आहे. रामायण, महाभारतामध्येही आयुर्वेदाचा उल्लेख आढळतो. माणसाचे शरीर ही खरी संपत्ती असून, त्या संपत्तीचा आपण योग्य वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. प्रदीप देशमुख यांनी केले. मंठा येथील जिल्हा परिषद शाळेत रविवारी युनानी आयुर्वेदिक आरोग्य तपासणी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पुढे देशमुख म्हणाले की, माणूस आयुष्यभर पैसे कमावण्याच्या मागे धावतो. या नादात तो आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. मात्र, शरीर ही माणसाची खरी संपत्ती आहे. ती संपत्ती टिकविण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करून आपल्या शरीराची काळजी घ्यावी. आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये प्रत्येकजण हा व्याधीने त्रस्त आहे म्हणून मानवाने पुरातन आयुर्वेदाचा उपयोग करून आपले शरीर निरोगी बनवावे, असेही ते म्हणाले. या शिबिरात २४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड. मधुकर मोरे, हाफेज शबाब बागवान, डॉ. राहुल राठोड, डॉ. त्रिभुवन शेख एजाज, संतोषी दायमा यांची उपस्थिती होती.

Web Title: The body is the real property of man: Pvt. Pradeep Deshmukh