शिराढोण तळ्यात शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 14:15 IST2021-09-18T14:14:29+5:302021-09-18T14:15:01+5:30
शेतकरी सायंकाळी जनावरे बांधण्यासाठी शेतात गेले होते.

शिराढोण तळ्यात शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला
अंबड : तालुक्यातील शिराढोण येथील तळ्यात एका शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि.17 ) सकाळी उघडकीस आली. रंजीत विष्णू जमधडे ( 37 ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
बुधवारी ( दि. 15) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रंजीत जमधडे जनावरे बांधण्यासाठी शेतात गेले होते. परंतु, तो रात्री उशीर झाला तरी ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, शुक्रवार (दि. 17) सकाळी सहा वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना गावाजवळील तळ्यात रंजीत जमधडे यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, आई असा परिवार आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. संपत होनाजी जमाडे यांच्या माहितीवरून अंबड पोलीसांनी ( ए.डी क्र.:-77/2021 कलम 174 सी.आर.पी.सी. नुसार ) आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरवडे करत आहेत.