शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये भाजपचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

नेर : पालकमंत्री राजेश टोपे हे नेर येथील १३२ केव्हीचे उपकेंद्र इतरत्र हलविण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करीत भाजपच्या ...

नेर : पालकमंत्री राजेश टोपे हे नेर येथील १३२ केव्हीचे उपकेंद्र इतरत्र हलविण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने शनिवारी नेर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्यासह इतर आंदोलकांनी टोपे यांच्यावर टीकेचा भडीमार करीत उपकेंद्र इतरत्र हलविण्यास विरोध करीत त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यात विजेचे जाळे निर्माण व्हावे यासाठी जालना व परतूर येथे २२० केव्ही, नेर येथे १३२ केव्ही यासह जिल्हाभरात ४९- ३३ केव्ही मंजूर केल्या होत्या. त्यातील जवळपास सर्वच ते २३ केव्ही सुरू झाल्या असून, शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न बऱ्यापैकी संपवण्याचे काम लोणीकर यांनी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. नेर येथील १३२ केव्ही उपकेंद्र सत्तेचा गैरवापर करून हलविण्याचा घाट पालकमंत्री राजेश टोपे यांनी घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पालकमंत्री टोपे यांनी स्वत: निधी मंजूर करून आणावा व त्या माध्यमातून विजेचे जाळे निर्माण करावेत, असे प्रा. सहदेव मोरे यावेळी म्हणाले. हा प्रकल्प येथून हलविला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, पालकमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण केले जाईल, असा इशाराही मोरे यांनी दिला. चौकट

प्रकल्प कार्यान्वित करावा

जालना येथील कन्हैयानगरमधील १३२ केव्ही केंद्रातून नेर, मानेगाव, सेवली ३२ केव्ही केंद्राला विजेचा पुरवठा होतो. पावसाळ्यात सतत वीज पुरवठा खंडित होतो. परिणामी या भागातील शंभरावर गावे, तांडे, वस्ती, वाड्यांवरील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी नेर येथील प्रकल्प तत्काळ सुरू करून रामनगर, नेर, बाजीउम्रद, सेवली, मौजपुरी, पांगरी गोसावीसह परिसरातील गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

फोटो