शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल माफीसाठी भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

जयंतीनिमित्त अभिवादन दानापूर : येथील सम्यक बद्ध विहारात माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी माता रमाई यांच्या प्रतिमेचे ...

जयंतीनिमित्त अभिवादन

दानापूर : येथील सम्यक बद्ध विहारात माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा मीराबाई राऊत, सोनल राऊत, सुमनबाई पानपाटील, पंचफुलाबाई पैठने, वंदना राऊत आदी उपस्थित होते.

चंदनझिरा येथे एकाची आत्महत्या

चंदनझिरा : फ्लॅटमध्ये राहत असलेल्या एकाने किचनरूममधील वरच्या मजल्याला लागून असलेल्या कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. सुधीर साळवे असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वाहनचालकांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन

जालना : राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरटीओ कार्यालयाच्यावतीने शिकाऊ वाहनचालकांना सोमवारी वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले. रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहन चालवताना हेल्मेट, सीट बेल्ट वापरणे तसेच वाहन कायदा नियमांचे पालन करून वाहने चालवावी, असे आवाहन आरटीओ विजय काळे यांनी केले.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेसाठी अर्ज करा

जालना : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत मुलींना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केले आहे. गुणवंत मुलींना पुरस्कार, रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक वितरित करण्यात येणार आहे. यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत तालुकास्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन केेले.

वाङ‌्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका सादर करा

जालना : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार या योजनेअंतर्गत निवडीअंती २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकासाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील लेखकांनी व प्रकाशकांनी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन केले आहे.

अंबड ते शिर्डी पायी दिंडीचे आयोजन

जालना : शहरातील ओमशांती कॉलनीतून शिर्डीकडे पायी दिंडी रवाना झाली. या दिंडीत संदीप आरगडे, कैलास सपकाळ, गोपी घायाळ, संकेत भवर, गोविंद परळकर, अभिषेक मोहळे, बाळू भांदरगे आदी सहभागी झाले आहे. ही पायी दिंडी अंबड, पाचोड, पैठण, शेवगाव, कुकाना, नेवासा, श्रीरामपूर मार्गे शिर्डीला गेली आहे. गावागावांत चहापाणी, फराळ व जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांनी केली असल्याचे संदीप आरगडे व केलास सपकाळ यांनी सांगितले.,

घरफोडीच्या गुन्ह्यात सातजणांची केली चौकशी

जालना : जालना शहरातील श्रीकृष्ण-रुक्मिणी मंदिर परिसरात एकाच्या घरात घुसून चोरट्यांनी तब्बल १५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला आहे. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांनी संशयित सातजणांची चौकशी केली. परंतु, अजूनही या घरफोडीचा चंदनझिरा पोलिसांना काहीच क्लू मिळाला नाही. यापूर्वीच्याही काही गुन्ह्यांचा तपास पोलीस करत आहे. लवकरच छडा लावण्याचे आश्वासन देण्यात आले.