दुचाकी चोरणारे तीन अट्टल गुन्हेगार भोकरदन पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:47 PM2020-12-11T17:47:02+5:302020-12-11T17:50:35+5:30

crime news गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील 20 ते 25 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.

Bhokardan police arrest three notorious criminals for stealing two-wheelers | दुचाकी चोरणारे तीन अट्टल गुन्हेगार भोकरदन पोलिसांच्या ताब्यात

दुचाकी चोरणारे तीन अट्टल गुन्हेगार भोकरदन पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देएक आरोपी फरार झाला असून अधिक तपास सुरु आहेपोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

भोकरदन : अट्टल दुचाकी चोरट्यांच्या मागावर असलेल्या भोकरदन पोलिसांनी औरंगाबाद येथील पैठण रोड येथून तीन आरोपींना ९ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यावेळी एक आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. किशोर प्रकाश गाडेकर ( 24 ), कृष्णा पांडुरंग सहाणे ( 20, रा भोकरदन ) व शरद केशवराव जाधव ( 20, रा पेरजापुर ता. भोकरदन ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर गणेश दळवी हा आरोपी फरार आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील 20 ते 25 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. त्या पैकी काही गाड्या बेवारस सापडल्या. मात्र, अद्याप 15 दुचाकी सापडल्या नाहीत. चोरीला गेलेल्या गाड्यांचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. दरम्यान, शुभम सुधीर गाढे ( रा. बाभूळगाव ) याची दुचाकी ( एम एच 21/येजे/7441 ) ८ डिसेंबरच्या पहाटे घरासमोरून चोरीस गेली. त्याने पोलिसात याची तक्रार देत भोकरदन येथील गणेश दळवी याच्यावर संशय व्यक्त केला. दरम्यान, ८ डिसेंबरला रात्री ८ वाजेच्या दरम्यान शुभम गाढेला त्याची दुचाकी माजी आमदार कार्यालयाजवळ दिसल्याची माहिती मिळाली. त्याने लागलीच याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच तरुण गाडी सोडून पळाला. तेथे असलेल्या दुचाकीवरील दुसऱ्या एकासोबत सिल्लोडच्या दिशेने फरार झाला. 

दुसऱ्या दिवशी ९ डिसेंबरला पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन स्ट्रेस केले. आरोपी औरंगाबाद येथील पैठण रोडवर असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलीस पथकाने लागलीच कारवाई करत पैठण रोडवरील एका हॉटेलवर धाड टाकली. यावेळी हॉटेलमधील चार आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, एक आरोपी गणेश दळवी फरार झाला आहे. पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलशिग बहुरे, पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, कर्मचारी आर. एस. भोपळे, समाधान जगताप यांनी केली. 

Web Title: Bhokardan police arrest three notorious criminals for stealing two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.