भोकरदन (जि. जालना): दुसऱ्याच्या शेतात तब्बल ५० वर्षांपासून सालगडी म्हणून घाम गाळणाऱ्या बापाच्या कष्टाचे त्याच्या मुलाने चीज केले आहे. भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील रहिवासी असलेल्या राजू किसनराव कोलते याने 'सीए' (Chartered Accountant) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, एका कष्टकरी कुटुंबाचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
कुटुंबाचा संघर्ष आणि जिद्दकिसनराव कोलते आणि सुनंदाबाई कोलते हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून भोकरदन येथील विनायक औटी यांच्याकडे शेतमजुरी आणि सालगडी म्हणून काम करत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना मोठा मुलगा गजानन एका दुकानात काम करून भाऊ-बहिणीच्या शिक्षणाला हातभार लावतोय. राजू लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता, मात्र आर्थिक चणचण होती. अशा वेळी शेतमालक विनायक औटी यांनी केलेल्या मदतीमुळे राजूचे शिक्षण पूर्ण होऊ शकले. केवळ राजूच नाही, तर त्याची बहीण लक्ष्मी हिने देखील जिद्दीने 'फार्मासिस्ट' पदवी मिळवली आहे.
"सीए काय असतो ठाऊक नाही, पण पोरगा मोठा झाला"१ मार्च रोजी सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राजूने जेव्हा ही आनंदाची बातमी आपल्या आई-वडिलांना सांगितली, तेव्हा ते शेतात राबत होते. 'सीए' म्हणजे नेमके काय, हे या अशिक्षित पालकांना ठाऊक नाही; मात्र आपला मुलगा मोठा साहेब झाला आणि त्याने आपल्या कष्टाचे सोनं केले, ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. "आम्ही आयुष्यभर कष्ट केले, पण पोराने आज आमची मान गर्वाने उंच केली," अशा शब्दांत किसनराव कोलते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Web Summary : Despite parents working as farm laborers, Raju Kolte cleared the CA exam. His success, supported by his family and a generous landlord, fulfilled a lifelong dream and brought pride to his family in Bhokardan.
Web Summary : किसान माता-पिता के बेटे राजू कोलते ने सीए परीक्षा पास की। परिवार और उदार जमींदार के समर्थन से मिली सफलता ने भोकरदन में उनके परिवार को गर्व से भर दिया।