शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

बरंजळा लोखंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोठवाल तर उपसरपंचपदी लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

बरंजळा लोखंडे ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पॅनलप्रमुख बालाजी लोखंडे यांच्या भाजप पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनलमधील सात ...

बरंजळा लोखंडे ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पॅनलप्रमुख बालाजी लोखंडे यांच्या भाजप पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनलमधील सात सदस्य विजयी झाले होते. त्यानंतर शुक्रवारी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी विशेष बैठक घेण्यात आली. यात सरपंचपदासाठी सुमनबाई गोठवाल व उपसरपंचपदी पंखाबाई लोखंडे यांचे एकमेव अर्ज आले. त्यामुळे या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. दोन्ही पदासाठी पंढरीनाथ सुखदेव लोंखडे, हिरालाल भावसिंग जावळे, राधाबाई भाऊसाहेब लोंखडे, रुख्मनबाई दामोधर लोंखडे, हौसाबाई प्रभाकर लोंखडे आदी सदस्यांनी मतदान केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

चौकट

कादोलीच्या सरपंचपदी गिरणारे

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील कादोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती गिरणारे तर उपसरपंचपदी माधवराव गिरणारे यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलप्रमुख भगवान गिरणारे यांनी धुरा सांभाळली होती. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट

उपसरपंचपदी वराडे

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील नळणी खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे भास्कर वराडे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणुकीत गजानन वराडे यांनी धुरा सांभाळली होती. एकूण ९ सदस्यापैकी ३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यात नवनिर्वाचित उपसरपंच भास्कर वराडे यांच्यासह सचिन वराडे, शेख मोसिन आदींचा समावेश आहे. तर ६ सदस्यांच्या झालेल्या निवडणुकीत गणेश देठे, रमेश वराडे, भागुबाई वराडे, मिनाबाई वाकोदकर, वंदना देठे हे विजयी झाले होते.