बदनापूर पोलीस ठाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST2021-03-04T04:57:26+5:302021-03-04T04:57:26+5:30

कोठारी स्कूलमध्ये काणे यांचा सत्कार जालना : राज्य क्रिकेट असोसिएशनच्या समितीवर निवड झाल्याबद्दल राजू काणे यांचा कोठारी इंटरनॅशनल ड्रीम ...

Badnapur police station investigation | बदनापूर पोलीस ठाण्याची तपासणी

बदनापूर पोलीस ठाण्याची तपासणी

कोठारी स्कूलमध्ये काणे यांचा सत्कार

जालना : राज्य क्रिकेट असोसिएशनच्या समितीवर निवड झाल्याबद्दल राजू काणे यांचा कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी विनयकुमार कोठारी, प्रसन्ना कोठारी, संगीता परदेशी, मुख्याध्यापक एस.मुकिंदा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संत नरहरी महाराज यांना अभिवादन

घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास ज्ञानेश्वर दहिवाळ, अमोल आडानी, राम शहाणे, कृष्णा ढेकळे, अनिल ढेकळे, ओम शेडुते, विकास उदवंते, नारायण दहिवाळ, रामेश्वर दहिवाळ, शिवाजी शेडुते, भरत दहिवाट आदींची उपस्थिती होती.

गुटखा विक्री जोमात

जालना : शहरासह ग्रामीण भागात गुटख्याची राजरोस विक्री सुरू आहे. राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना, संबंधित विभागाकडून कारवाईकडे डोळेझाक केली जात आहे. संबंधितांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Badnapur police station investigation