बदनापूर येथे बेशिस्त वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:31 IST2021-01-25T04:31:52+5:302021-01-25T04:31:52+5:30

पोलीस अधीक्षकांना विविध मागण्यांचे निवेदन जालना : उमरगाव येथील जिजाऊ ब्रिगेड प्रदेश महासचिव सारिका लोकरे-अंबुरे यांच्या ...

Action on unruly vehicles at Badnapur | बदनापूर येथे बेशिस्त वाहनांवर कारवाई

बदनापूर येथे बेशिस्त वाहनांवर कारवाई

पोलीस अधीक्षकांना विविध मागण्यांचे निवेदन

जालना : उमरगाव येथील जिजाऊ ब्रिगेड प्रदेश महासचिव सारिका लोकरे-अंबुरे यांच्या ११ वर्षांच्या मुलावर राहत्या घरी काही अज्ञात हल्लेखोरांनी १८ जानेवारी रोजी हल्ला केला. मुलाला आम्ही तुझ्या आईला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली, तसेच घरातील सामानही अस्ताव्यस्त करून टाकले. त्यामुळे लहान मुलाच्या मनावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. या प्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

मुलाला घेऊन महिला बेपत्ता; गोंदी पोलिसांत तक्रार

जालना : शहागड येथील बस स्थानकात पती, तसेच लहान मुलासह आलेली महिला पतीची नजर चुकवून लहान मुलाला घेऊन बेपत्ता झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात पतीच्या तक्रारीवरून पत्नी, तसेच मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार शनिवारी दाखल करण्यात आली आहे. गोकुळ सखाराम माळी (रा. गोपाळ वस्ती, बेलगाव, ता.गेवराई, जि. बीड) हे पत्नी अलका गोकुळ माळी (२५) व मुलगा संग्राम गोकुळ माळी (५) यांच्यासोबत शनिवारी शहागड येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी आले होते.

Web Title: Action on unruly vehicles at Badnapur