शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या वाहनाला अपघात; एक जण ठार, २५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:20 IST

मध्यप्रदेशातील मजुरांना गेवराई येथे घेऊन येणारी मालवाहतूक जीप उलटली. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, २२ मजूर किरकोळ जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देजालना : औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील घटना, सर्व मजूर मध्यप्रदेशातील

वडीगोद्री (जि. जालना) : मध्यप्रदेशातील मजुरांना गेवराई येथे घेऊन येणारी मालवाहतूक जीप उलटली. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, २२ मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. यात महिला, पुरूषांचाही समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ घडला.मध्यप्रदेशातील ३० मजुरांना गेवराई येथील बाहुबली जिनिंग येथे कामासाठी एका वाहनातून (एम. पी. १०- जी. ११८२) आणण्यात येत होते. हे वाहन औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ (ता. अंबड) शुक्रवारी सकाळी आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्या गेले. रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले. या अपघातात वाहनातील २५ मजूर जखमी झाले. पैकी तिघे गंभीर तर २२ जणांना किरकोळ दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रूग्णवाहिकेतून व इतर वाहनातून जखमींना पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिनेश छतरसिंग सोलंकी (२६ रा. शिरवेल जि. बडवानी, मध्यप्रदेश) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संगीता सोलंकी (१५ ), पप्पू रमेश चव्हाण (२० रा. आमसरी ता. भगवानपुरा, जि. खरगोन), गणेश काकडी जमरे (२१ रा. शिरवेल), तुकाराम ब्राम्हणे (१२ रा. आमसरी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन), बिला गणेश जमरे (१८ रा. शिरवेल), संगीता भुवरे (१८), स्नेहल, शीतल यादव (२२), वर्षा सोलंकी (२०), मंजू कांतीलाल दुवे (२०), रेवती हिरालाल सोलंकी (२४), घोडेलाल जलसिंग भुवरे (२४ सर्व रा. शिरवेल) हे मजूर जखमी झाले.वाहनचालक फरारअपघात झाला त्यावेळी वाहनातील अनेक मजूरही झोपेत होते. चालकाला झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटलेआणि अपघात झाल्याचे काही मजुरांनी सांगितले.अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून, पोलीस त्याचाशोध घेत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू