शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

२ हजार ब्रास वाळूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:12 AM

अंबड तालुक्यातील पाथरवाला, गोंदी आणि हसनापूर येथील गोदावरी नदी पात्रात विभागीय आयुक्ताच्या पथकाने मंगळवारी अचानक भेट देऊन मोठी कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोंद्री / गोंदी : अंबड तालुक्यातील पाथरवाला, गोंदी आणि हसनापूर येथील गोदावरी नदी पात्रात विभागीय आयुक्ताच्या पथकाने मंगळवारी अचानक भेट देऊन मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानिक महसूल प्रशासनासह वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.या पथकाने जवळपास २ हजार २२६ ब्रास वाळूसाठे जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, या पथकाने गोदावरी नदी पात्राचे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यामातून चित्रीकरणही केले.या आयुक्तांच्या पथकाने मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास भेट देऊन ही कारवाई केली. या पथकात आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या सूचनेनुसार बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे या पथकात परभणीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, बीडचे बी. एल. कांबळे, पाथरीचे बी. एल. कोळी, वसमतचे प्रवीण फुलारी, परळीचे गणेश महाडिक, विद्या धरवडकर, जालन्याचे पाटीलयांच्यासह माजलगाव, पाथरी येथील तहसीलदार मंडळाधिकारी, तलाठी यांचा समावेश होता. या कारवाई दरम्यान हसनापूर गोदावरी पात्रात ४४ ब्रास, गोंदी गोदापात्रात ९०५ तर लक्ष्मीआई मंदिराजवळ ७१७ ब्रास, पाथरवाला ४१० ब्रास तसेच बीड जिल्ह्यातील हिंगणगाव येथे १५० ब्रास वाळू, अशी एकूण २ हजार २२६ ब्रास वाळू साठ्याचा पंचनामा करून जप्त करण्यात आली.गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदी पात्रात जालना तसेच बीड जिल्ह्यातील वाळू माफियांनी हैदोस घातला होता. दरम्यान यापूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनीही सहा महिन्यांपूर्वी गोदापात्रात अचानक भेट देऊन मोठा वाळूसाठा जप्त केला होता.

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय