शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

जालना जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार बालकांना पल्स पोलिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:06 AM

जिल्ह्यातील १ हजार ७१७ बुथवर २ लाख ५४ हजार २९० बालकांपैकी २ लाख ३३ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील १ हजार ७१७ बुथवर २ लाख ५४ हजार २९० बालकांपैकी २ लाख ३३ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.जिल्हा महिला व बाल रुग्णालयात सकाळी १० वाजता पल्स पोलिओ मोहिमेच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर , वैद्यकीय अधीक्षक तसेच दवाखान्यातील डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा व शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी मोहीमेची माहिती दिली. त्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आगामी पाच दिवस घरोघरी एक पथक पाठवून ज्या बालकांना रविवारी मात्रा देणे पालकांना शक्य झाले नाही, अशा बालकांना पोलिओ मात्रा पाजण्यात येणार आहे. रविवारी ठराविक पल्स पोलिओ केंद्रांबरोबरच जिल्ह्यात बसस्थानक व रेल्वेस्थानक येथे देखील पल्स पोलिओ मात्रा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २१३ उपकेंद्राअतंर्गत ग्रामीण भागातील ० ते ५ वर्षांच्या आतील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. बथुवर ४ हजार ६६९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधंgovernment schemeसरकारी योजना