शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

झिम्बाब्वेचे अध्यक्ष  रॉबर्ट मुगाबे नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:35 PM

झिम्बाब्वेच्या लष्कराचे बुधवारी देशावर नियंत्रण असून देशाचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे (९३) यांनी ‘मला घरात कैदेत अटकेत ठेवण्यात आले आहे’, असे सांगितले.

ठळक मुद्देमुगाबे यांच्या अवतीभवती असलेल्या गुन्हेगारांनाच आम्ही लक्ष्य करीत आहोत. आम्ही आमच्या मोहिमेत यशस्वी झालो की परिस्थिती सर्वसाधारण बनेल अशी अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले

झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे नजरकैदेतहरारे : झिम्बाब्वेच्या लष्कराचे बुधवारी देशावर नियंत्रण असून देशाचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे (९३) यांनी ‘मला घरात कैदेत अटकेत ठेवण्यात आले आहे’, असे सांगितले. तथापि, लष्कराच्या जनरल्सनी बंड झाल्याचा इन्कार केला आहे. हरारेत संसदेबाहेरील रस्ते लष्कराच्या वाहनांनी अडवून ठेवल्यामुळे काही दशकांपासूनची सत्तेवरील मुगाबे यांची पकड ढिली होत असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ सैनिकांनी मंगळवारी रात्री उशिरा दूरचित्रवाणी वाहिनीवरून देशाला उद्देशून भाषण केले. अध्यक्ष आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे, असे मेजर जनरल सिबुसिसो मोयो यांनी हळूहळू वाचून दाखवलेल्या निवेदनात म्हटले. मुगाबे यांच्या अवतीभवती असलेल्या गुन्हेगारांनाच आम्ही लक्ष्य करीत आहोत. आम्ही आमच्या मोहिमेत यशस्वी झालो की परिस्थिती सर्वसाधारण बनेल अशी अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले. मोयो म्हणाले, लष्कराने सरकार ताब्यात घेण्याचा हा प्रकार नाही. ब्रिटनपासून १९८० मध्ये झिम्बाब्वे स्वतंत्र झाला तेव्हापासून मुगाबे यांचीच सत्ता असून जनरल्सच्या या कृतीमुळे त्यांच्या सत्तेला मुख्य आव्हान निर्माण झाले आहे. झिम्बॉब्वेच्या शेजारचा देश दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष जॅकोब झुमा म्हणाले की, मी दूरध्वनीवर मुगाबे यांच्याशी बोललो आहे. मुगाबे यांच्या जवळचे असलेल्यांपैकी झुमा हे एक आहेत. झुमा यांनी शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहनही केले आहे. मुगाबे यांच्या हुकुमशाहीला लष्कराने प्रदीर्घकाळ आधार दिला परंतु गेल्या काही आठवड्यांत दोघांमधील तणाव जाहीर झाला होता. लष्कर प्रमुख जनरल कॉन्स्टटिनो चिवेंगा यांचे वर्तन ‘देशद्रोही’ असल्याचे सत्ताधारी झेडएएनयु-पीएफ पक्षाने मंगळवारी म्हटले होते. मुगाबे यांनी देशाचे उपाध्यक्ष एम्मर्सन म्नॉनगावा यांना पदावरून दूर केल्यावर चिवेंगा यांनी मुगाबे यांच्यावर टीका केली होती. म्नॉनगावा यांना पदावरून दूर केल्यावर मुगाबे यांची पत्नी ग्रेस (५२) या अत्यंत महत्वाच्या पदावर पोहोचल्या होत्या. मुगाबे यांच्या वारस म्हणजेच देशाच्या अध्यक्षपदी त्या जाणार होत्या व याला लष्करातील वरिष्ठ अधिकाºयांचा तीव्र विरोध होता.