शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

१९२ देशांमध्ये ‘योग’साधनेचा मेळा

By admin | Updated: June 22, 2015 00:47 IST

पहिला जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी हजारो लोकांनी रविवारी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. जगात ठिकठिकाणी लोक आपले

मेलबर्न/लंडन : पहिला जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी हजारो लोकांनी रविवारी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. जगात ठिकठिकाणी लोक आपले शरीर ताणत होते, वाकवत होते आणि वेगवेगळ्या योगमुद्रा करीत होते. जगभरातील १९२ देशांमधील २२५ शहरांमध्ये योगदिन साजरा करीत भारताच्या मोहिमेत भरीव योगदान दिले. आॅस्ट्रेलियात विविध शहरांत योग दिन साजरा झाला आणि प्रत्येक ठिकाणी हजारांपेक्षा जास्त लोक योगासने करताना दिसत होते. पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनीही योगाच्या जागतिक आवाहनाचे कौतुक केले. मेलबर्नमधील स्प्रिंग लीझर सेंटरमध्ये ५०० लोक सूर्यनमस्कार घालताना दिसत होते. थेम्स नदीच्या काठावर समारंभब्रिटनमधील अनेक शहरांत योग दिन साजरा झाला. मुख्य समारंभ लंडन शहरात थेम्स नदीच्या काठी झाला. थेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर बर्नी स्पेन गार्डनमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. सिंगापूरमधील दोन तास सिंगापूरमध्ये ५० केंद्रांवर योग दिनाचे कार्यक्रम झाले. त्यात ४ हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व सिंगापूरमधील भारताचे उच्चायुक्त विजय ठाकूर सिंग यांनी तसेच सिंगापूरच्या पंतप्रधान कार्यालयातील मंत्री ग्रेस फू यांनी केले. थायलंडमध्ये योगा स्टुडिओ थायलंडमध्ये बँकॉक विद्यापीठाच्या मैदानावर योगा स्टुडिओ उभारण्यात आला. हजारो भारतीयांसह परदेशी लोकांनी योगासनांच्या कार्यक्रमात अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. चालुलोंगकोर्न विद्यापीठाच्या मैदानात दूतावासातर्फे कार्यक्रम आयोजिण्यात आला. (वृत्तसंस्था)