शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातही योग दिन

By admin | Updated: June 10, 2015 02:22 IST

पाकिस्तानने भारतीय योग प्रशिक्षकांना व्हिसा देण्यास नकार दिला असला तरी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनी तेथे नियोजित वेळेनुसार भातीय दूतावासात योगासने होतील.

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतीय योग प्रशिक्षकांना व्हिसा देण्यास नकार दिला असला तरी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनी तेथे नियोजित वेळेनुसार भातीय दूतावासात योगासने होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, पाकिस्तानने नेमक्या कुठल्या कारणाने ३० भारतीय योग प्रशिक्षकांना व्हिसा नाकारला याची कल्पना नाही. परंतु आम्ही अंतर्गत व्यवस्था केली आहे. तेथील योग प्रशिक्षकांच्या देखरेखीखालीच हा कार्यक्रम होईल. ४७ मुस्लीम देश योगदिन सहप्रायोजकही आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.पंतप्रधानांची हजेरी, पण योगासन करणार नाहीत एका प्रश्नाच्या उत्तरात स्वराज यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर होणाऱ्या योग कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. परंतु ते योगासने मात्र करणार नाहीत. राजपथावरील कार्यक्रमाचे आयोजन योगगुरू रामदेवबाबा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर स्वत: स्वराज या दिवशी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. याप्रसंगी आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून आणि अध्यक्ष सॅम कुटेसा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. योगदिन कार्यक्रमात सहभागासाठी कुणावरही दबाव आणला जाणार नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना राजपथावरील योगदिन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु यासंदर्भातील त्यांच्या नकारात्मक वक्तव्यावरून ते या कार्यक्रमात सहभागी होतील असे वाटत नाही, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्राचा आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.