भारताच्या कारवायांची फाइल सोपविणार

By Admin | Updated: October 23, 2015 01:51 IST2015-10-23T01:51:22+5:302015-10-23T01:51:22+5:30

पाकिस्तानात होणाऱ्या विध्वंसक कारवायांमागे भारताचा हात असून, त्याबाबतची फाइलच आपण भारताला सोपविणार असल्याचा अजब दावा पाकिस्तानचे विदेश सचिव

Will file files for India's operations | भारताच्या कारवायांची फाइल सोपविणार

भारताच्या कारवायांची फाइल सोपविणार

वॉशिंग्टन : पाकिस्तानात होणाऱ्या विध्वंसक कारवायांमागे भारताचा हात असून, त्याबाबतची फाइलच आपण भारताला सोपविणार असल्याचा अजब दावा पाकिस्तानचे विदेश सचिव एजाज अहमद चौधरी यांनी केला आहे.
येथे पत्रकारांशी बोलताना एजाज अहमद चौधरी म्हणाले की, ‘भारताशी होणाऱ्या यापुढील चर्चेत या तीन फाइल सोपविल्या जातील. अर्थात, या फाइल म्हणजे भारताने पाकिस्तानात केलेल्या विध्वंसक कारवायांचे पुरावेच आहेत. या फाइल तत्पूर्वीच अमेरिकेकडे सोपविण्यात आल्या,’ असे सांगून चौधरी म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांना याची माहिती असायला हवी, म्हणून या फाइल अमेरिकेकडे सोपविल्या आहेत.’
एजाज अहमद चौधरी म्हणाले की, ‘या फाइलमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर माहिती देण्यात आली आहे, ते आताच आम्ही सांगणार नाही. सरकारकडून याबाबत निर्णय झाल्यानंतर आम्ही तो विषय सार्वजनिक करू.’ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी अमेरिकेकडे तीन फाइल सोपविल्या आहेत. प्रामुख्याने कराची, कबीलाई आणि बलुचिस्तानात होणाऱ्या विध्वंसक कारवायात भारताचा हात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

Web Title: Will file files for India's operations