शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही भारताविरुद्ध हे होऊ देणार नाही...', श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी मोदींसमोर मोठी घोषणा केली; चीनचे नाव न घेता इशारा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा ४ ते ६ एप्रिल दरम्यान आहे. पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती  अनुरा कुमार दिसानायके यांनी भारत-श्रीलंका संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. राष्ट्रपती दिसानायके यांनी भारताच्या सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी श्रीलंकेच्या वचनबद्धतेचा पुन्हा कदा  उच्चार केला.

यावेळी बोलताना श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके म्हणाले, श्रीलंका आपल्या भूमीचा वापर भारताच्या सुरक्षेविरुद्ध किंवा प्रादेशिक स्थिरतेच्या विरुद्ध असलेल्या कोणत्याही कारणासाठी करू देणार नाही. पंतप्रधान मोदींशी औपचारिक चर्चेनंतर कोलंबोमध्ये हे विधान देण्यात आले. हे भारत आणि श्रीलंकेमधील खोल विश्वास आणि सहकार्याचे प्रतिबिंब आहे.

पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान मिळाला, दोन्ही देशांमध्ये संरक्षणासह महत्वाचे करार झाले

राष्ट्रपती दिसानायके यांनी एका महत्त्वाच्या सागरी मुद्द्यावर पंतप्रधान मोदींकडून सहकार्य मागितले. त्यांनी पंतप्रधान मोदींना श्रीलंकेच्या दाव्यावर संयुक्त राष्ट्र महासागर आयोगासोबत तांत्रिक चर्चा जलद करण्याची विनंती केली. हा मुद्दा श्रीलंकेच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या पलीकडे असलेल्या सागरी सीमांशी संबंधित आहे.

डिजिटल अर्थव्यवस्थेत सहकार्य

राष्ट्रपती दिसानायके यांनी डिजिटल अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात सहकार्याच्या शक्यतेवरही चर्चा केली. ते म्हणाले की, श्रीलंकेला वाढ, नवोन्मेष आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी डिजिटल अर्थव्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. श्रीलंकेच्या डिजिटल ओळख प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपयांची आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान मिळाला

श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींना श्रीलंका मित्र विभूषणाया हा सर्वोच्च गैर-नागरी सन्मान प्रदान केला. या सन्मानानंतर पंतप्रधान मोदी यांनी 'हा १४० कोटी भारतीयांसाठी सन्मान असल्याचे म्हटले आहे . पीएम मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती, सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी