शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध आता शेवटच्या टप्प्यात, नाकेबंदीवरून पुन्हा तणाव, युद्धविरामाचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 07:28 IST

Iran War News: इराणविरुद्धच्या युद्धाचा शेवट जवळ आला असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असतानाच, इराणी बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे अंमलात आणल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली आहे.

कैरो - इराणविरुद्धच्यायुद्धाचा शेवट जवळ आला असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असतानाच, इराणी बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे अंमलात आणल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली आहे. दरम्यान, युद्धविराम वाढवण्यासाठी मध्यस्थांचे प्रयत्न सुरू असून दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या टेबलावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, नाकेबंदीमुळे संतापलेल्या इराणने आखातातील व्यापार रोखण्याचा इशारा दिला आहे. २२ एप्रिलपर्यंत लागू असलेल्या युद्धविरामाचा कालावधी किमान दोन आठवड्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर अमेरिकेने आताच माघार घेतली तर इराणची पुन्हा उभारणी करण्यासाठी २० वर्षे लागतील, असेही ते म्हणाले. ट्रम्प यांच्या या वक्तव्याच्या काही तास आधी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, इराणी बंदरे व किनारी भागांकडे जाणारी जहाजे रोखण्यात आली आहेत तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करताना जहाजांवर कोणतेही निर्बंध असू नयेत याला आमचा पाठिंबा आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, मला काही गोष्टींची दिशा बदलावी लागली. तसे केले नसते तर इराणकडे आताच्या घडीला अण्वस्त्रे असण्याची शक्यता होती. इराणसोबतच्या चर्चेची दुसरी फेरी पुढील दोन दिवसांत इस्लामाबादमध्ये होऊ शकते. (वृत्तसंस्था)

इराण नाराज : नाकेबंदी ही युद्धविराम भंगाची पूर्वतयारी इराणी माध्यमांनुसार, संयुक्त लष्करी कमांडचे प्रमुख अली अब्दोल्लाही यांनी सांगितले की, “राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी इराण ठामपणे पावले उचलेल. अमेरिकेची नाकेबंदी ही युद्धविराम भंगाची पूर्वतयारी आहे

अमेरिकेने इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी कायम ठेवल्यास पर्शियन गल्फ, ओमान समुद्र आणि रेड सी परिसरातील आयात-निर्यात पूर्णपणे रोखू, असा कडक इशारा इराणने दिला आहे

इराणची कठोर तपासणी आवश्यक : आयएईएअमेरिका-इराण करारामध्ये इराणच्या अणुकार्यक्रमाची पडताळणी करण्यासाठी तपशीलवार उपाययोजना समाविष्ट असणे आवश्यक आहे, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने म्हटले आहे.

अणुसंपन्नतेवर चर्चा शक्यइराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बाघाई यांनी युरेनियम समृद्धीकरणाच्या पातळीवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली, मात्र ‘गरजेनुसार समृद्धीकरण सुरू ठेवण्याचा अधिकार’ कायम राहील, असे स्पष्ट केले.

लेबनाॅन, इस्रायलमध्ये ४० वर्षांनी प्रथमच थेट चर्चाबैरुत : इस्रायल आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेशी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये लेबनॉन आणि इस्रायल यांनी अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच थेट राजनैतिक चर्चा केली. मात्र, त्यानंतरही लेबनॉनमध्ये २०० ठिकाणांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. त्यामुळे तणाव कायम आहे.

‘जग विक्रम’ दाखल : २०४०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन ‘जग विक्रम’ हे जहाज गुजरातमध्ये दाखल झाले आहे.

पाक लष्करप्रमुख इराणमध्येइस्लामाबाद : लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ तेहरानमध्ये दाखल झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War Nears End; Tensions Rise Over Blockade, Ceasefire Extension Sought

Web Summary : US claims Iran war nearing end, imposing port blockade. Iran threatens trade disruption. Ceasefire extension efforts underway amid rising tensions and potential renewed talks. IAEA seeks Iran nuclear program verification.
टॅग्स :IranइराणUnited StatesअमेरिकाWarयुद्ध