आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:31 IST2025-04-29T11:26:26+5:302025-04-29T11:31:44+5:30

Vanshika Saini News: वंशिका कॅनडामध्ये शिक्षण घेत होती. २२ एप्रिल रोजी तिचं घरच्यांशी शेवटचं बोलणं झालं होतं. दोन दिवस ती घरी परतच आली नाही म्हणून तिच्या रुममेटने कुटुंबीयांना कॉल करून सांगितले.

Vanshika Saini, AAP leader's daughter, found dead under suspicious circumstances in Ottawa, Canada | आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता

आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता

Crime News: २१ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यानीचा मृतदेह कॅनडातील एका समुद्र किनाऱ्यावर आढळून आला. विद्यार्थीनी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्याची मुलगी असून, ती कॅनडात शिक्षण घेत होती. ओट्टावातील समुद्र किनाऱ्यावर तिचा संशयास्पद स्थिती मृतदेह आढळून आला. वंशिका सैनी असे मयत मुलीचे नाव असून, ती आपचे पदाधिकारी दविंदर सैनी यांची मुलगी होती. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२१ वर्षीय वंशिका सैनी २२ एप्रिलपासून बेपत्ता होती. ती एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होती. 

वंशिकाच्या रुममेटने दिली माहिती

दविंदर सैनी हे आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते आपचे आमदार कुलजीत सिंग रंधावा यांचे सर्व काम पाहतात. वंशिका घरीच आलेली नाही आणि ती बेपत्ता असल्याची माहिती त्यांना २५ एप्रिल रोजी तिच्या रुममेटकडून कळली.

वाच >>कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार 

२२ एप्रिलपासून वंशिका घरी न आल्याने तिच्या रुममेटने २५ एप्रिल रोजी तिच्या कुटुंबीयांना कॉल केला. त्यानंतर तिने स्थानिक पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली. तिला उच्चायुक्तालयात संपर्क करण्यास सांगण्यात आले. तिने ओट्टावा येथील भारतीय उच्चायुक्तालयात वंशिका बेपत्ता असल्याची तक्रार दिली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

वंशिकाचे वडील दविंदर सैनी यांनी सांगितले की, तिचे शवविच्छेदन झाले आहे. तिचा मृतदेह परत आणण्यासाठी वेळ लागेल. आमचं तिच्यासोबत शेवटचं बोलणं २२ एप्रिल रोजी झालं होतं. 

ती खूप हुशार होती, शाळेत पहिली आली होती
 
आमदार रंधावा म्हणाले की, मी तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. वंशिकाच्या मृत्यूची बातमी ऐकून आम्ही दुखात आहोत. ती हुशार होती. डेरा बस्सीमधील शाळेत ती पहिली आली होती. कॅनडातही ती चांगला अभ्यास करत होती. दविंदर माझा जवळचा सहकारी आहे आणि माझ्या कार्यालयातील सगळं काम पाहतो. वंशिकांच्या मृत्यूने आमची खूप मोठी हानी झाली आहे. 

आमदार रंधावा यांनी खासदार राज कुमार छब्बेवाल आणि बलबीर सिंग सिच्चेवाल यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना याची माहिती दिली. वंशिकाचा मृतदेह परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. 

Web Title: Vanshika Saini, AAP leader's daughter, found dead under suspicious circumstances in Ottawa, Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.