शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...तर त्या देशांवर जास्तीत जास्त कर लादू; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत, चीनला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:58 IST

USA News: आम्हाला त्रास होणार असेल, तर आम्ही त्या देशांवर नक्कीच कर लादणार...

USA News: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून अवैध रहिवासी आणि टॅरिफसंबंधी मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच, ट्रम्प यांनी मंगळवारी (28 जानेवारी 2025) पुन्हा एकदा अमेरिकेच्या हितासाठी शुल्क लादण्याबाबत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही देशावर सरकार कर लागू करेल. भारत, चीन आणि ब्राझीलचे नाव घेत ते म्हणाले की, हे देश अमेरिकेवर सर्वाधिक कर लावतात.

फ्लोरिडा येथे रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही त्या देशांवर आणि बाहेरील लोकांवर कर लादणार आहोत जे आमचे नुकसान करतील. ते त्यांच्या देशासाठी चांगले काम करत असले तरी त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. आम्हाला त्रास होणार असेल, तर आम्ही अशा देशांवर नक्कीच कर लादणार आहोत. चीनमध्ये प्रचंड शुल्क आकारले जाते. भारत, ब्राझील आणि इतर अनेक या यादीत आहेत. 

आता आम्ही असे होऊ देणार नाहीत, कारण आमचे अमेरिकेला प्रथम प्राधान्य असेल. अमेरिका अशी व्यवस्था निर्माण करेल, जी न्याय्य असेल आणि आपल्या तिजोरीत पैसा आणेल, जेणेकरुन अमेरिका पुन्हा श्रीमंत होईल. आम्ही आमच्या नागरिकांवर कर लादून इतर देशांना समृद्ध करणार नाही, तर इतर देशांवर कर लादून आम्ही आमच्या नागरिकांना श्रीमंत बनवू. इतर देशांवरील शुल्क वाढल्याने अमेरिकन लोकांवरील कर कमी होतील आणि अधिक रोजगार आणि कारखाने निर्माण होतील. 

ट्रम्प यांनी यापूर्वीही ब्रिक्स देशांवर 100 टक्के कर लागू करण्याची धमकी दिली आहे. भारतही ब्रिक्स समूहाचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या घोषणेमुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. ज्यांना शुल्क टाळायचे आहे, त्यांनी अमेरिकेत कंपन्या आणि कारखाने सुरू करावे,असेही ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले. ट्रम्प पुढे म्हणाले की, युनायटेड स्टेट्स येथे कारखाने उभारणाऱ्या कंपन्यांना, विशेषत: फार्मास्युटिकल्स, सेमीकंडक्टर आणि स्टील सारख्या उद्योगांमध्ये मदत करेल. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीन