इराणविरुद्ध सुरू असलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' या मोहिमेत अमेरिकेने आपल्या शक्तीचा प्रचंड वापर केला आहे. गेल्या २८ दिवसांत अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर आणि पायाभूत सुविधांवर ८५० पेक्षा जास्त टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. क्षेपणास्त्रे वापरण्याचा हा दर इतका जास्त आहे की, अमेरिकेचा एकूण साठा आता 'धोकादायक' पातळीवर पोहोचला आहे.
अमेरिकेकडे युद्धापूर्वी सुमारे ४,००० ते ४,५०० टोमाहॉक क्षेपणास्त्रे होती. त्यापैकी तब्बल पाचवा हिस्सा (२५%) केवळ एका महिन्यात इराणवर वापरण्यात आला आहे. लष्करी भाषेत याला 'विंचेस्टर' म्हणतात, ज्याचा अर्थ 'दारुगोळा संपत आला आहे' असा होतो. एका टोमाहॉक क्षेपणास्त्राची किंमत सुमारे २० लाख डॉलर्स (अंदाजे १६ कोटी रुपये) आहे. ८५० क्षेपणास्त्रांचा हिशोब केल्यास, अमेरिकेने केवळ क्षेपणास्त्रांवर आतापर्यंत अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. क्षेपणास्त्रे वापरण्याचा हा वेग इतका जास्त आहे की, अमेरिकेचा स्वतःचा साठा आता 'धोकादायक' पातळीवर पोहोचला असून पेंटागॉनमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पेंटागॉनमधील अधिकाऱ्यांच्या मते, अमेरिकेने आपल्या एकूण टोमाहॉक साठ्यापैकी २५% (एक चतुर्थांश) साठा केवळ एका महिन्यात इराणवर वापरला आहे. मध्यपूर्वेतील साठा आता अत्यंत कमी झाला आहे.
काय आहे टॉमहॉकचे महत्त्व? अचूकता: हे मिसाईल १,६०९ किमी (काही प्रगत आवृत्ती २,५०० किमी) दूरवरून ४५३ किलो स्फोटके शत्रूच्या छाताडावर अचूक पाडू शकते.
सुरक्षितता: याला 'रिमोट वॉर' शस्त्र म्हटले जाते, कारण अमेरिकन सैनिकांना जमिनीवर न उतरता युद्धनौका किंवा पाणबुडीतून हे डागता येते.
निर्मितीचा कासवगती वेगएका टॉमहॉक मिसाईलची निर्मिती करण्यासाठी साधारण २ वर्षांचा कालावधी लागतो. अमेरिका सध्या वर्षाला केवळ ६०० मिसाईल्स बनवू शकते. ज्या वेगाने इराणवर हल्ले सुरू आहेत, तो पाहता वापरलेला साठा भरून काढण्यासाठी अमेरिकेला अनेक वर्षे लागतील.
अवाढव्य खर्चएका टॉमहॉकची किंमत सुमारे ३४ कोटी रुपये आहे. ८५० मिसाईल्सचा हिशोब केल्यास अमेरिकेने आतापर्यंत सुमारे २९,००० कोटी रुपये केवळ या एका शस्त्रावर खर्च केले आहेत.
जपानसोबतचा करार अडचणीतटॉमहॉकचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी अमेरिका जपानमध्ये 'जॉइंट प्रोडक्शन' करणार होती. मात्र, अमेरिकेच्या कडक अटींमुळे (तंत्रज्ञानावर पूर्ण नियंत्रण, तिसऱ्या देशाला विक्री बंदी इ.) हा करार सध्या रखडला आहे.
Web Summary : America heavily used Tomahawk missiles in 'Operation Epic Fury' against Iran, depleting its stockpile. The US fired over 850 missiles, costing billions. Replenishing this arsenal presents production and geopolitical challenges.
Web Summary : ईरान के खिलाफ 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' में अमेरिका ने टॉमहॉक मिसाइलों का भारी इस्तेमाल किया, जिससे भंडार कम हो गया। अमेरिका ने 850 से अधिक मिसाइलें दागीं, जिस पर अरबों डॉलर खर्च हुए। इसकी भरपाई में उत्पादन और भू-राजनीतिक चुनौतियां हैं।