शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: मुंबईत पावाच्या लादीत ५ रुपयांची वाढ, पेट्रोल-डिझेलही महागले
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
6
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
7
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
8
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
9
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
10
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
11
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
12
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
13
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
14
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
15
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
16
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
17
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
18
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
19
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
20
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
Daily Top 2Weekly Top 5

आखाती देशात युद्ध आणखी पेटणार! इराणचा अमेरिकेच्या 'अब्राहम लिंकन' युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला, दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:52 IST

इराणच्या नौदलाच्या कादेर क्रूझ क्षेपणास्त्रांनी युएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू जहाजाला लक्ष्य केले, त्याला आपला मार्ग बदलण्यास भाग पाडले, असे इराणी लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांसाठी इराणवरील हल्ले थांबवले असले तरी, इराण माघार घ्यायला तयार नाही. मध्य-पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे. इराणने दावा केला आहे की, त्यांनी बुधवारी अमेरिकेच्या 'अब्राहम लिंकन' या युद्धनौकेवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. सरकारी टीव्हीवरून प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, इराणी लष्कराने अमेरिकेला इशारा दिला आहे की, जेव्हा हल्ला करणाऱ्या गटाची जहाजे टप्प्यात येतील, तेव्हा आणखी क्षेपणास्त्रे डागली जातील.

इराणसोबत युद्ध वर्षभर चालणार?; मोसाद प्रमुखांनी इस्रायली पंतप्रधानांना दिलेला सीक्रेट रिपोर्ट

इराणच्या नौदलाच्या कादेर क्रूझ क्षेपणास्त्रांनी युएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू जहाजाला लक्ष्य केले, मार्ग बदलण्यास भाग पाडले," असे इराणी लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात नौदल प्रमुख ॲडमिरल शहराम इराणी यांच्या हवाल्याने असेही म्हटले आहे की, विमानवाहू जहाजांच्या गटाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि शत्रूचा ताफा त्यांच्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या टप्प्यात येताच इराणी नौदल जोरदार हल्ला करेल.

या आघी इराणी नौसेनेने अमेरिकेला इशारा दिला होता. 'अमेरिकन अब्राहम लिंकन सतत निगराणीखाली आहे आणि जर ती इराणच्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या टप्प्यात आली तर नौदलाकडून तिला लक्ष्य केले जाईल, असेही यामध्ये म्हटले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली

तेहरानमधील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी अमेरिकेचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर नाकारल्यानंतर हा नौदल इशारा देण्यात आला आहे. त्यांनी वॉशिंग्टनच्या काही दिवसापूर्वी  झालेल्या राजनैतिक प्रयत्नांना केवळ देखावा असल्याचे म्हटले आहे. प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झोल्फघारी यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिकेने पूर्वी दाखवलेली सामरिक शक्ती आता एक डावपेचात्मक पराभव ठरली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran claims missile attack on US warship, warns of more.

Web Summary : Iran claims to have fired cruise missiles at the USS Abraham Lincoln, warning of further attacks if US ships approach. Despite earlier de-escalation, tensions remain high, with Iran dismissing US diplomatic efforts as a facade.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाIranइराण