इराण युद्धात पाकिस्तान मध्यस्थी म्हणून पुढे पुढे करत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात एक मध्यस्थी करणारा देश म्हणून पाकिस्तान बडेजाव आणत आहे. त्यातच अमेरिकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. अमेरिकन संसदेच्या एका रिसर्च रिपोर्टमुळे पाकिस्तानातील दहशतवादी कारनामांची पोलखोल पुन्हा एकदा झाली आहे. पाकिस्तान अनेक दहशतवादी संघटनांचा जुना अड्डा आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालतोय. ज्यातील अनेक १९८० पासून सक्रीय आहेत असंही रिपोर्टमध्ये सांगितले आहे.
अमेरिकन काँग्रेसचा हा रिपोर्ट २५ मार्च रोजी आला होता, ज्यातून पुन्हा एकदा पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयदाता बनल्याचे स्पष्ट झाले आहे. रिपोर्टमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना त्यांच्या उद्दिष्टांवरून विभागणी केली आहे. ज्यात जागतिक, अफगाणिस्तान केंद्रीत, भारत केंद्रीत आणि देशांतर्गत अथवा धार्मिक दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. त्यातील कमीत कमी १२ संघटनांना अमेरिकन कायद्यानुसार परदेशी दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. बहुतांश संघटना इस्लामी कट्टरपंथी विचारधारेच्या असून त्या सतत सक्रीय बनल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात सैन्य कारवाई सुरू आहे. ज्यात हवाई हल्ले आणि गुप्त माहितीच्या आधारे शेकडो कारवाया केल्या जातात. परंतु दहशतवादी नेटवर्क पूर्णपणे संपवण्यात अपयश आले आहे. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या अनेक दहशतवादी संघटना आजही पाकिस्तानच्या जमिनीवर सक्रीय आहेत. ज्या दहशतवादी संघटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात लश्कर-ए-तोयबा यांचा समावेश आहे. १९८० च्या दशकात त्याची स्थापना झाली होती. २००१ साली या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले.
हाफिज सईदच्या नेतृत्वाखाली ही संघटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून आणि पाकव्याप्त काश्मीरमधून कार्यरत आहे. निर्बंध टाळण्यासाठी या संघटनेने नंतर जमात-उद-दावा हे नाव वापरण्यास सुरुवात केली. या गटात हजारो दहशतवादी आहेत. ही दहशतवादी संघटना २००८ च्या मुंबई हल्ल्यांसाठी जबाबदार होती. या रिपोर्टमध्ये मसूद अझरने २००० मध्ये स्थापन केलेल्या जैश-ए-मोहम्मदचाही उल्लेख आहे. २००१ मध्ये तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले. या दहशतवादी संघटनेचे अंदाजे ५०० दहशतवादी भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत. हरकत-उल-जिहाद इस्लामी, हरकत-उल-मुजाहिदीन आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या इतर संघटनांचाही उल्लेख आहे. 'द रेझिस्टन्स फ्रंट'चाही उल्लेख आहे, ज्याचा संबंध लश्कर-ए-तोयबाशी असल्याचे मानले जाते. या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ला घडवून आणला, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या संघटनेला आता जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Web Summary : A US report reveals Pakistan's role as a haven for terrorist organizations, some active since the 1980s. Despite military operations, groups like Lashkar-e-Taiba and Jaish-e-Mohammed persist. The report highlights Pakistan's failure to dismantle terrorist networks, raising concerns amid its mediation efforts between Iran and the US.
Web Summary : अमेरिकी रिपोर्ट में पाकिस्तान को आतंकवादी संगठनों के लिए सुरक्षित आश्रय बताया गया है, जिनमें से कुछ 1980 के दशक से सक्रिय हैं। सैन्य अभियानों के बावजूद, लश्कर-ए-तैयबा और जैश-ए-मोहम्मद जैसे समूह बने हुए हैं। रिपोर्ट में ईरान और अमेरिका के बीच मध्यस्थता प्रयासों के बीच पाकिस्तान की विफलता पर चिंता जताई गई है।