शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 09:37 IST

US Election 2024 : लिचमन यांना अमेरिकेचा 'नॉस्ट्रॅडॅमस' म्हटले जाते. लिचमन यांनी अनेक देशांतील निवडणुकांसंदर्भात अंदाज वर्तवले आहेत. त्यांची भविष्यवाणी कधीही चुकीची ठरलेली नाही.

Donald Trump vs Kamala Harris, US Election 2024 : अमेरिकेचा पुढचा अध्यक्ष कोण असेल डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरीस? यासंदर्भात आणखी काही वेळाने चित्र स्पष्ट होईल. मतदानानंतर, या दोहोंपैकी कोण जिंकणार, यासंदर्भात कयास लावले जात आहेत. मात्र, यातच आता एका मोठ्या भविष्यवाणीने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका दिला आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांना कमला हॅरिस यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज अमेरिकन लेखक तथा राजकीय भविष्यवाणीकरता ॲलन लिचमन यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचे म्हणजे, लिचमन यांना अमेरिकेचा 'नॉस्ट्रॅडॅमस' म्हटले जाते. लिचमन यांनी अनेक देशांतील निवडणुकांसंदर्भात अंदाज वर्तवले आहेत. त्यांची भविष्यवाणी कधीही चुकीची ठरलेली नाही.

सर्व ओपिनिअन पोल आगीमध्ये फेकून द्यायला हवेत -लिचमन यांनी एनडीटीव्हीशी बोलताना कमला हॅरिस ट्रम्प यांच्याविरोधात आघाडी घेतील, अशी भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले, "सर्व ओपिनिअन पोल आगीमध्ये फेकून द्यायला हवेत. मी म्हणतो, आपल्याकडे कमला हॅरिस असतील. त्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन-आशियन वंशाच्या पहिल्या राष्ट्रपती बनत आहेत."

असे आहेत आतापर्यंतचे निकाल -फॉक्स न्यूजनुसार, सध्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. ट्रम्प यांना 21o इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली आहेत, तर डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना 113 इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली आहेत.'स्विंग स्टेट्स'कडे जगाचे लक्ष, ...तर अमेरिकेत इतिहास घडेल - मतदान अंदाजाचा विचार करता, आतापर्यंतच्या मतदानात कोणताही मोठा बदल झालेला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या राज्यांनी कमला हॅरिय यांना विजय मिळवून दिला आहे. तर रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी कौल दिला आहे. त्यामुळे आता ७ स्विंग स्टेट्सचे निकाल येईपर्यंत कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नाही. उत्तर कॅरोलिना, नेवाडा, विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि ऍरिझोना अशी ही ७ राज्ये आहेत. स्विंग स्टेट्स ही अशी राज्ये आहेत जिथे दोन पक्षांमधील मतांचे अंतर खूपच कमी असते. त्यामुळे या राज्यांमध्ये पारडे कुणाच्याही बाजूने झुकू शकते. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत कमला हॅरिस जिंकल्या, तर 230 वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला देशाची राष्ट्राध्यक्ष बनेल.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाKamala Harrisकमला हॅरिस