शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

जिंकणार तर मीच ! ट्रम्प-हॅरिस यांचा दावा, अवघ्या एका दिवसावर आली अमेरिकेची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 06:27 IST

US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यात तुल्यबळ लढत हाेत आहे. दाेन्ही उमेदवार आपणच जिंकणार, असा दावा करीत आहेत.

वाॅशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यात तुल्यबळ लढत हाेत आहे. दाेन्ही उमेदवार आपणच जिंकणार, असा दावा करीत आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत दाेन्ही उमेदवार मिशिगन, जार्जिया, आणि पेनसिल्हानिया या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या राज्यांत प्रचार करीत आहेत.

हॅरिस यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत न्युयाॅर्कमध्ये धावती भेट दिली. दुसरीकडे ट्रम्प यांनी मिशिगन येथे हॅरिस यांच्यावर टीकास्त्र साेडले. हॅरिस यांच्या आर्थिक अपघाताचा आपण अंत करणार असून लवकरच ट्रम्प यांच्या नव्या आर्थिक चमत्काराला सुरुवात हाेईल, असे ट्रम्प म्हणाले. 

मिशिगनमध्ये पारडे ट्रम्प यांच्या बाजूने फिरले?भारतीय आणि आफ्रिकन वंशाच्या नागरिकांसह मिशिगन या राज्यातील काही मुस्लिम मतदारांनी अखेरच्या क्षणी ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. ही डेमाेक्रॅटिक मते हाेती. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना मते दिली हाेती.ट्रम्प यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. उलट हॅरिस यांनी यापूर्वी कधीही स्वत:ला भारतीय समुदायाशी जाेडले नाही. असे येथील व्यावसायिक नेत्यांचे मत आहे. 

अमेरिका-भारत भागीदारी महत्त्वाची- कमला हॅरिस यांचे समर्थक व भारतीय वंशाचे डेमाेक्रॅटिक नेते नील माखीजा यांनी सांगितले की, जगासाठी अमेरिका-भारत भागीदारी खूप महत्त्वाची आहे.- कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष झाल्यास ती आणखी वृद्धिंगत हाेईल. संरक्षण तसेच हवामान बदलासारख्या समस्यांवर भारत आणि अमेरिका जगाला मार्ग दाखवू शकतात.-हे ओळखणाऱ्या राष्ट्राध्यक्षाची गरज असून कमला हॅरिस या त्यासाठी याेग्य आहेत, असे माखीजा म्हणाले.  

 

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिस