शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 09:08 IST

US Attack On Iran Nuclear Site: इराणमधील तीन अणुकेंद्रांना लक्ष्य करत केलेल्या हल्ल्यानंतर देशाला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सक्त इशारा दिला आहे. इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे अन्यथा इराणवर आणखी मोठे हल्ले होतील, अशी ताकिद डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

मध्य-पूर्वेमध्ये इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये आता अमेरिकेचाही थेट प्रवेश झाला आहे. अमेरिकेने इराणमधील तीन प्रमुख अणुकेंद्रांना अत्याधुनिक बी-२ बॉम्बर्स विमानांद्वारे हल्ला करत लक्ष्य केले आहे. त्यानंतर देशाला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सक्त इशारा दिला आहे. इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे अन्यथा इराणवर आणखी मोठे हल्ले होतील, अशी ताकिद डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्पाहान येथील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देशावासियांना संबोधित केले. त्यात ते म्हणाले की, आम्ही एक अवघड लक्ष्य निवडलं होतं. रात्री आम्ही ते साध्य करण्यात यश मिळवलं. इराणमधील प्रमुख अणुकेंद्रांना पूर्णपणे नष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकन सैन्याने रात्री जशी कामगिरी केली तशी जगातील कुठलंही सैन्यदल करू शकत नाही.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, इराणची अणुसंवर्धनाची क्षमता नष्ट करणे आणि त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या संभाव्य आण्विक संकटाला पूर्णपणे नष्ट करणे हा अमेरिकेचा हेतू होता.  मागच्या ४० वर्षांपासून इराण अमेरिकेविरोधात कारवाया करत होता. तसेच अनेक अमेरिकन नागरिक त्याची शिकार झाले होते. त्यामुळे हे आता फार काळ चालणार नाही, असा निश्चय मी केला होता. 

मध्य पूर्वेत दादागिरी करणाऱ्या इराणने आता शांतता प्रस्थापित केली पाहिजे. जर त्यांनी तसं केलं नाही तर त्यांच्यावर आणखी मोठे हल्ले होतील, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, मागच्या ४० वर्षांपासून इराण इस्राइलला, अमेरिकेला संपवण्याची भाषा बोलत आहे. इराणने आमच्या अनेक लोकांना मारले आहे. बॉम्बहल्ले करून अनेकांचा हातपाय तोडले आहेत. इराणी जनरल कासिम सुलेमानी याने अनेकांची हत्या केली आहे. त्यामुळेच हे फार काळ चालू देणार नाही, असं मी ठरवलं होतं, असेही डोनाल्ड ट्रम्प देशाला संबोधित करताना म्हणाले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल