आनंदावर युद्धाचं सावट! प्री-वेडिंग शूटसाठी दुबईला गेले अन् अडकले; कुटुंबाची सरकारला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:19 IST2026-03-03T09:18:34+5:302026-03-03T09:19:27+5:30

उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय नगर येथील रहिवासी असलेले पाच जण सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकले आहेत.

up couple trapped in dubai during pre wedding shoot due to iran war crisis | आनंदावर युद्धाचं सावट! प्री-वेडिंग शूटसाठी दुबईला गेले अन् अडकले; कुटुंबाची सरकारला विनंती

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय नगर येथील रहिवासी असलेले पाच जण सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकले आहेत. हॉटेल व्यावसायिक अजय जैन यांचा मुलगा प्रिन्स याचं एप्रिल महिन्यात लग्न होणार आहे. या लग्नाच्या प्री-वेडिंग शूटसाठी प्रिन्स, त्याचा धाकटा भाऊ, होणारी पत्नी आणि तिचे भाऊ-वहिनी असे पाच जण चार दिवसांपूर्वी दुबईला गेले होते. 

२ मार्च रोजी भारतात परत येण्याचं त्यांचं तिकीट होतं, परंतु इराणयुद्धाचा भडका उडाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ते तिथेच अडकले आहेत. हे कुटुंब सध्या बुर्ज खलिफा जवळील एका हॉटेलमध्ये थांबलं असून सुरक्षित परत येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागत आहेत. प्रिन्स आणि त्याचं कुटुंब मोठ्या उत्साहात दुबईला पोहोचलं होतं. बुर्ज खलिफासारख्या अतिशय सुंदर लोकेशन्सवर त्यांचं शूटिंग सुरू होतं, मात्र अचानक युद्धाची स्थिती निर्माण झाली.

"मोदीजी-नितीशजी, आम्हाला सुरक्षित भारतात आणा", हल्ल्यातून थोडक्यात वाचला दीपक यांचा जीव

आता परिस्थिती अशी आहे की, जे कुटुंब आपल्या नवीन आयुष्याची स्वप्नं पाहत होतं, तेच आता हॉटेलच्या खोलीत बसून सुरक्षितरीत्या मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत आहेत. याच दरम्यान, कुटुंबीयांशी ते व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत आहेत, परंतु संवादादरम्यान मुलांच्या चेहऱ्यावर घरी परत न येण्याबाबतची चिंता आणि भीती स्पष्टपणे दिसून येत आहे.

भाजपा नेत्यासह मध्य प्रदेशमधील १०० नागरिक दुबईत अडकले; मोदींकडे मागितली मदत

"आता गमावण्यासारखं काहीच नाही..."; इराणमधील भीषण हल्ल्यानंतर ढसाढसा रडली अभिनेत्री

चंदौली येथे राहणारे अजय जैन आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रचंड काळजीत आहेत. त्यांनी सांगितलं की, मुलांना भारतात परतायचं होतं, पण आता ते तिथे अडकून पडले आहेत. अजय जैन यांनी भारत सरकारला तातडीने हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. घरातील आनंदाच्या वातावरणाचं रुपांतर आता चिंतेत झालं असून संपूर्ण कुटुंब सरकारकडे आशेने पाहत आहे.

Web Title : खुशी पर युद्ध का साया: प्री-वेडिंग शूट के लिए दुबई गए, परिवार फंसा

Web Summary : उत्तर प्रदेश का एक परिवार प्री-वेडिंग शूट के लिए दुबई गया और ईरान युद्ध के कारण फंस गया। परिवार ने भारत सरकार से सुरक्षित वापसी की गुहार लगाई है।

Web Title : War shadow on joy: Pre-wedding shoot in Dubai leaves family stranded.

Web Summary : A family from Uttar Pradesh is stuck in Dubai after going for a pre-wedding shoot due to escalating Iran war tensions. They appeal to the Indian government for safe return.