शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० संपुष्टात आणल्यास अशांतता

By admin | Updated: November 17, 2014 02:40 IST

नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांच्या मते, ३७० कलम संपुष्टात आणल्यास मोठ्या पातळीवर अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे.

लंडन : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त करण्याच्या भाजपाच्या ‘खतरनाक’ इराद्याबाबत चिंता व्यक्त करत राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले व नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांच्या मते, ३७० कलम संपुष्टात आणल्यास मोठ्या पातळीवर अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अब्दुल्ला हे सध्या लंडनमध्ये आहेत.गेल्या चार दशकांत प्रथमच सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला (७७ वर्षे) हे राज्य विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षाचे नेतृत्व करणार नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून किडनीवरील उपचारार्थ ते लंडनमध्ये आहेत.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘मी एक फलंदाज असून सध्या प्रकृती कारणास्तव येथे आहे. मात्र, मैदानात परतण्याची मोठी उत्सुकता आहे.’ येत्या फेब्रुवारीपर्यंत मायदेशी परतणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.अब्दुल्ला यांनी मुलाखतीत विविध मुद्यांना उत्तरे दिली. ते पुढे म्हणाले, ‘राज्यघटनेतील कलम ३७० समाप्त करण्याच्या भाजपाच्या इराद्याबद्दल मला मोठी चिंता वाटते. या कलमाने राज्याला विशेष दर्जा मिळाला आहे. या कलमासाठी महात्मा गांधी व भारत सरकारद्वारेही हमी देण्यात आली होती.’ भाजपा आपले लक्ष्य मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्येही त्यांच्याकडून देशातील अन्य भागांप्रमाणेच धु्रवीकरण केले जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. कलम ३७० रद्द केल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, राज्यातील तरुणांच्या मनात मोठी उलथापालथ होईल आणि आम्ही कधीच शांततेचे ध्येय गाठू शकणार नाही.