शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरुच, आणखी तीन अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण..?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:44 PM

Twitter News: काही दिवसांपूर्वीच सीईओ पराग अग्रवाल यांनी दोन अधिकाऱ्यांना काढून टाकले होते, त्यानंतर आता 3 अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

Twitter News:ट्विटर डीलनंतर कंपनीतील वाद हळूहळू वाढत चालला आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर अनेक बडे अधिकारी कंपनीला राम-राम ठोकत आहेत. एकीकडे ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि इलॉन मस्क ट्विटरवर आमने-सामने आले आहेत, तर दुसरीकडे कंपनीतून कर्मचाऱ्यांच्या बाहेर पडण्याचा सपाटा सुरुच आहे.

इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरला 44 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केल्याची घोषणा केली. पण, ताज्या माहितीनुसार, मस्क यांनी हा करार सध्या होल्डवर ठेवला आहे. या दरम्यान, कंपनीतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्यांनी ट्विटर सोडण्याचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

तीन लोकांचा निरोपरिपोर्ट्सनुसार, प्रोडक्ट मॅनेजमेंट फॉर हेल्थ, कन्वर्सेशन आणि ग्रोथच्या उपाध्यक्ष इल्या ब्राउन, ट्विटर सर्व्हिसेसच्या उपाध्यक्ष कतरिना लेन आणि डेटा सायन्सचे प्रमुख मॅक्स स्मायझर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. इलॉन मस्क यांच्या प्रवेशामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे या सर्व अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. लेन आणि मॅक्स स्मायझरच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते दोघेही सुमारे दीड वर्षांपूर्वी ट्विटरशी जोडले गेले होते, तर इल्या ब्राउन गेल्या 6 वर्षांपासून ट्विटरशी संबंधित होत्या. कंपनीने या सर्वांच्या जाण्याला दुजोरा दिला आहे. अलीकडेच कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांनी दोन उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले होते. 

टॅग्स :Twitterट्विटरParag Agrawalपराग अग्रवालelon muskएलन रीव्ह मस्क