घटत्या जन्मदरामुळे तुर्कस्तान हा चीन अन् युरोपीय देशांप्रमाणेच ‘वृद्धांचा देश’ होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 05:53 IST2026-01-31T05:53:03+5:302026-01-31T05:53:22+5:30

Turkey Population News: जगाच्या नकाशावर एक  आर्थिक शक्ती म्हणून ओळख असलेल्या तुर्कस्थानात जन्मदरात इतकी मोठी घट झाली आहे की तो चीन आणि अनेक युरोपीय देशांप्रमाणेच वृद्धांचा देश होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या वाढवण्यासाठी तुर्कस्थान सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

Turkey Population News: Due to the declining birth rate, Turkey is on the verge of becoming a 'country of the elderly' like China and European countries. | घटत्या जन्मदरामुळे तुर्कस्तान हा चीन अन् युरोपीय देशांप्रमाणेच ‘वृद्धांचा देश’ होण्याच्या मार्गावर

घटत्या जन्मदरामुळे तुर्कस्तान हा चीन अन् युरोपीय देशांप्रमाणेच ‘वृद्धांचा देश’ होण्याच्या मार्गावर

इस्तंबूल  - जगाच्या नकाशावर एक  आर्थिक शक्ती म्हणून ओळख असलेल्या तुर्कस्थानात जन्मदरात इतकी मोठी घट झाली आहे की तो चीन आणि अनेक युरोपीय देशांप्रमाणेच वृद्धांचा देश होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या वाढवण्यासाठी तुर्कस्थान सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन नागरिकांना किमान तीन मुले जन्माला घालण्याचे आवाहन सतत करतात. मात्र परिस्थिती अगदी उलट आहे. टर्कस्टॅट या सांख्यिकी संस्थेच्या आकडेवारीनुसार देशाचा एकूण प्रजनन दर घसरून १.५१ इतका झाला आहे. कोणत्याही देशाची लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी प्रजनन दर किमान २.१ असणे आवश्यक असते. याचा अर्थ असा की आता तुर्कीची लोकसंख्या भविष्यात घटण्याची शक्यता अधिक आहे. ही परिस्थिती चीन आणि जपानने दशकांपूर्वी अनुभवलेल्या परिस्थितीसारखीच आहे. 

सरकारच्या योजना अपयशी का ठरत आहेत? 
जन्मदर वाढवण्यासाठी तुर्कस्थान सरकारने आर्थिक प्रोत्साहन योजना, करसवलती, तसेच काम करणाऱ्या महिलांसाठी मातृत्व रजा यांसारख्या योजना लागू केल्या. मात्र या सर्व उपाययोजनांनंतरही अपेक्षित परिणाम दिसून आलेले नाहीत. 
गेल्या काही वर्षांपासून त्या देशात भीषण महागाई असून लिरा या चलनाची मोठी घसरण झाली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एकापेक्षा अधिक मुलांचा खर्च उचलणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे.

जीवनशैलीत बदल हेही महत्त्वाचे कारण
तुर्कस्थानातील तरुणांमध्ये उशिरा विवाह करण्याकडे किंवा ‘चाइल्ड-फ्री’ राहण्याकडे कल वाढला आहे. शहरीकरणामुळे मोठ्या कुटुंबांची जागा लहान कुटुंबांनी घेतली आहे. 
महिलांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे विवाहाचे सरासरी वय  वाढले आहे. त्याने प्रजननक्षम कालावधी कमी होत आहे. या गोष्टी कायम राहिल्या तर येत्या २० ते ३० वर्षांत तुर्कस्थानला तरुणांची तीव्र कमतरता भासू शकते.

Web Title : जन्म दर घटने से तुर्की में वृद्धों की आबादी बढ़ने का खतरा।

Web Summary : तुर्की में जन्म दर में गिरावट चीन और यूरोप के समान है, जिससे वृद्धों की आबादी बढ़ने का खतरा है। सरकारी प्रोत्साहनों के बावजूद जन्म दर गिर रही है। आर्थिक कठिनाई, विवाह में देरी और उच्च शिक्षा प्राप्त करने वाली महिलाओं की बढ़ती संख्या इस प्रवृत्ति में योगदान कर रही है, जिससे भविष्य में युवाओं की कमी हो सकती है।

Web Title : Turkey faces aging population crisis due to declining birth rates.

Web Summary : Turkey's birth rate decline mirrors China, Europe, risking an aging population. Despite government incentives like financial aid and maternity leave, the birth rate is falling. Economic hardship, delayed marriages, and women pursuing higher education contribute to this trend, potentially causing a future youth shortage.