शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 06:13 IST

गुरुवारी चीनने दुर्मीळ धातूंच्या निर्यातीवर नवीन नियंत्रण घातल्यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. चीनच्या या नियंत्रणांमुळे ते जगाला ओलीस ठेवत आहे, असा आरोप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला होता.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून येणाऱ्या सर्व आयातींवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. हा निर्णय १ नोव्हेंबरपासून किंवा त्यापूर्वीच लागू होऊ शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा मंदीच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

गुरुवारी चीनने दुर्मीळ धातूंच्या निर्यातीवर नवीन नियंत्रण घातल्यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. चीनच्या या नियंत्रणांमुळे ते जगाला ओलीस ठेवत आहे, असा आरोप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला होता. ट्रम्प हे द. कोरियाच्या दौऱ्यावर जात असून त्या दरम्यान ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होते. आता जिनपिंग यांच्यासोबत चर्चा होईल का याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे.  

चीनकडून नवे नियंत्रणगुरुवारी चीनने इलेक्ट्रॉनिक्स, संगणक चिप्स, जेट इंजिन यांसाठी वापरल्या जाणाऱ्या या धातूंच्या निर्यातीवर परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. चीनने लष्करी उत्पादनांमध्ये वापर होणाऱ्या या दुर्मीळ धातूंमधील घटकांच्या निर्यातीस पूर्ण बंदी घातली आहे. चीनकडे दुर्मीळ धातूंच्या एकूण खाणकामातील ७० टक्के खाणकाम असून चुंबकांचे ९३ टक्के उत्पादन चीन करत आहे. त्यामुळे हे निर्बंध अमेरिकेसाठी गंभीर आहेत.

ट्रम्प यांचा संताप दुर्मीळ धातूंवरच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचे चीनचे धोरण शत्रूसमान असून ते जगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. चीनच्या या निर्णयावर उत्तर म्हणून अमेरिकाही महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर नियंत्रण आणेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. 

शेअर बाजार अस्थिरअमेरिका व चीनच्या टॅरिफ  युद्धामुळे एस अँड पी ५०० निर्देशांक २.७ टक्क्यांनी घसरला. शुक्रवारचा दिवस एप्रिलनंतरचा सर्वात वाईट दिवस ठरला. आर्थिक विश्लेषकांच्या मते अमेरिकेच्या निर्णयामुळे सध्या लागू असलेल्या ३० टक्क्यांच्या करावर आणखी १०० टक्के आयातकर बसल्यास उभय देशांदरम्यानचा व्यापार पूर्णपणे ठप्प होऊ शकतो.

राजकीय-आर्थिक ताण वाढण्याची शक्यताटॅरिफ  युद्धामुळे अमेरिकेत महागाई वाढण्याबरोबरच रोजगार बाजारावरही परिणाम होऊ शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांची कपात आणि सध्या सुरू असलेला शटडाऊनमुळे आधीच अमेरिकेची आर्थिक वाढ मंदावल्याची चिन्हे आहेत.

चर्चेची गरज ‘स्टिम्सन सेंटर’च्या सन युन यांनी सांगितले की, बीजिंगचा हा निर्णय अमेरिकेकडून चीनवरील निर्बंधांच्या प्रत्युत्तरात घेतला गेला असून, दोन्ही बाजूंनी थोडी माघार घेतल्यास तणाव कमी करण्याची शक्यता अजूनही आहे. चीनच्या प्रवक्त्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Threatens 100% Tariffs on China, Recession Fears Rise

Web Summary : Trump threatens 100% tariffs on all Chinese imports, sparking global recession worries. China's rare earth export controls anger Trump, potentially impacting US software. Trade war escalates, impacting markets and potentially causing economic strain.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाchinaचीनTrade Tariff Warटॅरिफ युद्ध