शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:52 IST

US-Iran War Update: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी ३ बड्या जनरलना पदावरून हटवले आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक वाढली असून ट्रम्प यांनी जेडी वेन्स यांची फिरकी घेतली.

इराणसोबतच्यायुद्धाच्या रणधुमाळीत ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन लष्करी नेतृत्वात मोठी 'सर्जिकल स्ट्राईक' केली आहे. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आर्मी चीफ जनरल रँडी जॉर्ज यांच्यानंतर आता आणखी दोन वरिष्ठ जनरलना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, इराणसोबतच्या करारावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांची फिरकी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रँडी जॉर्ज यांच्यासोबतच खालील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. चीफ ऑफ आर्मी ट्रान्सफॉर्मेशन अँड ट्रेनिंग कमांड जनरल डेव्हिड होडने, चीफ ऑफ आर्मी चॅप्लिन कॉर्प्स जनरल विल्यम ग्रीन ज्युनियर यांनाही सक्तीने निवृत्त करण्यात आले आहे. लष्कराच्या पुनर्रचनेसाठी आणि ट्रम्प यांच्या धोरणांशी सुसंगत नेतृत्व आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

ट्रम्प यांची 'ईस्टर लंच'वर फटकेबाजीव्हाईट हाऊसमध्ये आयोजित ईस्टर लंच दरम्यान ट्रम्प यांनी इराण डीलबद्दल मिश्किल भाष्य केले. ते म्हणाले, "जर इराणसोबतची डील यशस्वी झाली, तर त्याचे पूर्ण श्रेय मी घेईन. पण जर ही डील फिसकटली, तर मी उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांना दोषी धरीन!" त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वर्दळ वाढली'विंडवार्ड' या समुद्री गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा हळूहळू वाढत आहे. बुधवारी या मार्गावरून १६ जहाजे सुखरूप बाहेर पडली. विशेष म्हणजे, फिलीपिन्सला इराणकडून सुरक्षित प्रवासाची अधिकृत परवानगी मिळाली आहे. युद्धापूर्वी या मार्गावरून दररोज १३० जहाजे जात असत, त्या तुलनेत हा आकडा अजूनही कमी असला तरी ही सकारात्मक सुरुवात मानली जात आहे.

इराणचा UN ला इशारासंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत होणाऱ्या मतदानापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी कडक इशारा दिला आहे. "कोणतीही प्रक्षोभक कारवाई, मग ती UN मध्ये का असेना, परिस्थिती अधिक गंभीर करेल," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump jokes Iran deal success his, failure Vance's; stirs controversy.

Web Summary : Trump quipped Iran deal success is his, failure Vice President Vance's, sparking laughter and controversy. Military leadership changes continue. Hormuz Strait sees increased ship traffic. Iran warns UN against provocative actions ahead of a vote.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध