तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 21:44 IST2025-11-28T21:42:52+5:302025-11-28T21:44:14+5:30
भारताच्या या मदतीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना नक्कीच मिरची लागली असेल.

तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
तिकडे पाकिस्तानकडूनअफगाणिस्तानवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. तर इकडे भारतानेअफगाणिस्तानला पुन्हा एकदा मानवी मदत पोहोचवली आहे. भारताने अफगाणिस्तानला महत्वाच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी तब्बल ७३ टन जीवनरक्षक औषधे, लसी आणि आवश्यक पूरक साहित्य पुरवले आहे. ही मदत तालिबान सरकारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली असून, ती अफगाणिस्तानसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे.
पाकिस्तानला मिरची लागणार -
महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढलेला असतानाच, भारत सरकारने ही मदत पाठवली आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानविरुद्ध गोळीबार आणि ड्रोन हल्ले करत तेथील निर्वासितांना बाहेर काढत आहे. अशा परिस्थितीत, भारताची ही मदत तालिबान सरकारसाठी वरदानापेक्षा कमी नाही. भारताच्या या मदतीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना नक्कीच मिरची लागली असेल.
पाकच्या हवाई हल्ल्यात ९ मुलांचा मृत्यू -
या पूर्व, पाकिस्तानने अफगाणिस्तानात केलेल्या हवाई आणि ड्रोन हल्ल्यांत नऊ मुलांचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर तालिबानने सीमापार तणाव वाढल्यास प्रत्युत्तर देण्यात येईल, असेही म्हटले होते. हे हल्ले पेशावरमधील आत्मघाती हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी करण्यात आले होते. ज्याचा संबंध पाकिस्तान अफगाण दहशतवाद्यांशी जोडतो.
Augmenting Afghanistan’s healthcare efforts.
— Randhir Jaiswal (@MEAIndia) November 28, 2025
🇮🇳 has delivered 73 tonnes of life-saving medicines, vaccines and essential supplements to Kabul to cater to urgent medical needs.
India’s unwavering support to the Afghan people continues. pic.twitter.com/G4IU1a2O3v
भारताने यापूर्वीही केली होती मदत
यापूर्वी, ऑक्टोबर २०२५ मध्ये, भारताने अफगाणिस्तानला अशाच पद्धतीची मानवी मदत केली होती. तेव्हा भारताने अफगाणिस्तानला २० रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) आणि इतर काही वैद्यकीय उपकरणे दान केली होती. ही मदत अफगाण जनतेप्रति भारताच्या दीर्घकालीन बांधिलकीचा भाग होती. यात सुसज्ज रुग्णवाहिका, इतर वैद्यकीय पुरवठा आणि सहा नवीन आरोग्य प्रकल्पांच्या घोषणेचा समावेश होता.